ेवगन, ज्याने 1991 मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अजय आजही बॉलिवूडमधील एक मोठा अभिनेता मानला जातो. ...
अजय देवगनचे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले ते त्याच्या वडिलांच्या प्रभावामुळे. अजयचे वडील वीरू देवगन हे प्रसिद्ध स्टंटमॅन होते. बॉलिवूडमधील कोरिओग्राफर आणि अॅक्शन डायरेक्टर म्हणून त्यांची मोठी ओळख होती. अजयला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीच्या जगात वाढण्याची संधी मिळाली. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षीच त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि 'फूल और कांटे' या चित्रपटातून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली.
'फूल और कांटे'च्या यशानंतर अजय देवगनने मागे वळून पाहिलं नाही. कारण या चित्रपटाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या 'लम्हे' चित्रपटाला मागे टाकले. 'लम्हे' प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वांनी अंदाज लावला होता की हा चित्रपट सुपरहिट होईल आणि अजय देवगनचा पहिला चित्रपट त्यासमोर फ्लॉप होईल. पण प्रदर्शित होताच, 'फूल और कांटे'ने बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवला.
त्यानंतर अजयने अनेक चित्रपट केले. तसेच 'सिंघम', 'गोलमाल', 'द्रिश्यम', 'रेड' आणि 'तान्हाजी' सारख्या चित्रपटांमध्ये देखील अभिनय करून बॉलिवूडमध्ये आपला ठसा सोडला. 'सिंघम' चित्रपटामधील भूमिकेमुळे तो प्रसिद्ध झाला. ज्याने त्याला एक वेगळीच ओळख दिली.
अजय देवगनला केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर एक दिग्दर्शक म्हणूनही ओळखले जाते. त्याने 'यू मी और हम' आणि 'शिवाय' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'शिवाय'मध्ये त्याने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती तीनही भूमिकांमध्ये काम केले, ज्यामुळे त्याच्या कलेला आणखी एक वाव मिळाला.
अजय देवगनच्या यशस्वी करिअरमध्ये त्याने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्याची अभिनयाची शैली खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या भूमिकांची विविधता त्याला अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी देते.
अजय देवगन आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूपच गुप्त आहे. त्याचे आयुष्य नेहमीच लाईमलाइटपासून दूर असते. त्याला आपल्या कुटुंबाबरोबरच एक शांत आणि खाजगी जीवन जगायला आवडते. अजय देवगण आणि पत्नी काजोल या दोघांना बॉलिवूडचे आदर्श जोडपं मानले जाते.
अजय देवगनचे खरे नाव अनेकांना माहित नसेल. त्याचे खरे नाव विशाल वीरू देवगन आहे. अजय देवगण आज त्याचा 56वा वाढदिवस साजरी करत आहे. त्याच्या 33 वर्षांच्या करिअरमध्ये त्याने आपल्या अभिनयाची एक नवी उंची गाठली आहे आणि तो अजूनही प्रत्येक चित्रपटासोबत नवा आदर्श निर्माण करत आहे.