PHOTOS

‘Antilia’ नावाचा नेमका अर्थ काय? अंबानी कुटुंबाने घरासाठी का निवडलं हे नाव?

Mukesh Ambani Home Antilia : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे त्यांच्या मुंबई येथील आलिशान 'अँटिलिया' या घरामुळे नेहमी चर्चेत येत असतात. अँटिलिया हे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचं निवासस्थान असून हे घर तब्बल 27 मजल्यांचं आहे.  

 

 

Advertisement
1/8

अँटिलिया ही भारतातील सर्वात महागड्या आणि जगातील 10 सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. 27 मजल्याच्या अँटिलियाची किंमत ही तब्बल 15,000 कोटी रुपये आहे. 

2/8

लंडनमधील बर्लिंघम पॅलेसनंतर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं महागडं घर आहे. 2016 मध्ये हे घर बनवून पूर्ण झालं, त्यावेळी हे घर बनवण्यासाठी एकूण 6,000 कोटी रुपयांचा खर्च आला. 

 

3/8

अँटिलियाचं आर्किटेक्चर शिकागोच्या आर्किटेक्ट 'पर्किन्स आणि विल' एन केलं आहे. ऑस्ट्रेलियन बांधकाम कंपनी 'लीटन होल्डिंग्ज' ने त्याचे बांधकाम पाहिले.  

 

4/8

अँटिलियामध्ये एकूण 27 मजल्याची इमारत असून अंबानी कुटुंब हे टॉप फ्लोरच्या खालील मजल्यावर राहतात. तर या घराला 6 मजल्याची तर केवळ पार्किंगच आहे. या पार्किंगमध्ये एकत्र 168 कार राहू शकतात. 

5/8

हेलिपॅड, जिम आणि स्विमिंगपूल : अँटिलियामध्ये 50 सीट्सचं चित्रपटगृह असून याच्यावर आउटडोर गार्डन सुद्धा आहे.  एका फ्लोरवरून दुसऱ्या फ्लोरवर जाण्यासाठी अनेक लिफ्ट आहेत तर यासोबतच 3 हेलीपेड, 4 स्विमिंग पूल, जिम, मंदिर सह हेल्द सेंटर सुद्धा आहे. 

6/8

मुकेश अंबानींच्या अँटिलिया याघराचं नाव अटलांटिक महासागरातील एका पौराणिक द्वीपच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. 

 

7/8

अँटिलिया हे नाव दुर्लभता आणि विशिष्टताची भावना जागवण्यासाठी निवडलं जातं, जे मालमत्तेची भव्यता आणि अद्वितीय स्वरूप प्रतिबिंबित करते.

 

8/8

अँटिलियामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी, मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका तसेच मुलं, धाकटा मुलगा आनंद अंबानी आणि त्याची पत्नी राधिका इत्यादी राहतात. 

 





Read More