PHOTOS

श्रीखंडाच्या नावामागचा अर्थ काय, पदार्थाला हेच नाव का देण्यात आले? द्वापारयुगाशी आहे संबंध

श्रीखंडाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. पण श्रीखंडाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला व नाव कसं पडलं हे जाणून घेऊया

Advertisement
1/7
श्रीखंडाच्या नावामागचा अर्थ काय, पदार्थाला हेच नाव का देण्यात आले? द्वापारयुगाशी आहे संबंध
श्रीखंडाच्या नावामागचा अर्थ काय, पदार्थाला हेच नाव का देण्यात आले? द्वापारयुगाशी आहे संबंध

महाराष्ट्रात दसरा व गुढीपाडव्याला आवर्जुन श्रीखंड-पुरीचा बेत केला जातो. तर सणासुदीच्या दिवशीही आवर्जुन श्रीखंड आणले जाते. काही जण घरीही श्रीखंड बनवतात. पण तुम्हाला माहीतीये का श्रीखंड हे नाव कसं पडलं. 

2/7

श्रीखंडाचा उगम कसा झाला याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काही जाणकारांच्या मते श्रीखंडाला 4 ते 5 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. द्वापारयुगात श्रीखंडाचा शोध लागला असल्याचे म्हटलं जातं. 

3/7

हिंदू धर्मात देवासंदर्भात कोणत्याही गोष्टीचा उच्चार करताना सुरुवातीला श्री लावण्याची प्रथा आहे. श्रीकृष्णाला दूध, दही, लोणी प्रिय होते. त्यामुळं एकदा श्रीकृष्णाला खुश करण्यासाठी असा पदार्थ बनवण्यात आल्याचं म्हटलं जातं. 

4/7

 श्रीकृष्णाला दही, लोणी अर्पण करताना एकदा त्यात केसर, वेलची, खडीसाखर व सुकी फळे टाकण्यात आली. तेव्हा हा नवीन पदार्थ तयार झाला. 

5/7

श्रीखंडाचे नाव कसे पडले याबाबत एक मान्यता आहे. खंड म्हणजे पदार्थाचा भाग अथवा तुकडा. तसंच, दूध, दही, तूप हे संपन्नतेचे लक्षण मानले जाते. देवास म्हणजे 'श्री' आणि अर्पण करावयाच्या पदार्थाला खंड असं म्हणून श्रीखंड असं नाव पडलं. 

6/7
श्रीखंड कसे तयार करतात
श्रीखंड कसे तयार करतात

सर्वप्रथम दह्यातील पाणी काढून ते एका फडक्यात टांगून ठेवतात. म्हणजे त्याचा चक्का तयार होते. मग यात साखर टाकून फेटून घेतात. यात आवडीनुसार, वेलची, केसर, बदाम, पिस्ता असे जिन्नस घालून श्रीखंड केले जाते. 

7/7

दही हे प्रोबायोटिक आहे. त्यामुळं पचनाला मदत होते. आरोग्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात दही खाणं योग्य असते तसंच, गुढी पाडव्याच्या दिवशी व दसऱ्याच्या दिवशी वातावरणात उष्णता असते त्यामुळं या दिवशी श्रीखंड बनवण्याची पद्धत रुजू झाली असावी 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More