PHOTOS

Mohammed Siraj: 13 कोटींचं आलिशान बंगला, लक्झरी कार्सचा ताफा… ‘DSP’ साहेबांची Net Worth माहितेय का?

Mohammed Siraj Net Worth:  मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोहम्मद सिराजने फक्त क्रिकेटच नव्हे तर आर्थिक यशाचंही ‘स्ट्राइक’ केलं आहे. चला त्याची नेट वर्थ जाणून घेऊयात. 

 

Advertisement
1/10

क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज बॉलिंग करत लोकांच्या मनात घर करणारा मोहम्मद सिराज आता फक्त क्रिकेटच नव्हे तर दौलत आणि प्रसिद्धीच्याही शिखरावर पोहोचला आहे.

2/10

इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटीत भारताचा विजय घडवून आणणारा सिराज आता केवळ ‘मॅच विनर’ नव्हे, तर करोडपती ‘ब्रँड’ बनला आहे.

3/10
गल्लीपासून ग्लॅमरपर्यंतचा प्रवास!
गल्लीपासून ग्लॅमरपर्यंतचा प्रवास!

हैदराबादच्या छोट्याशा गल्लीतून क्रिकेटची सुरुवात करणारा मोहम्मद सिराज आज 13 कोटींच्या बंगल्यात राहतो आणि रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज यांसारख्या लक्झरी गाड्यांमध्ये फिरतो.

4/10

2025 मध्ये त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज ५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बीसीसीआय, आयपीएल आणि ब्रँड डील्स  हे त्याचे प्रमुख कमाईचे स्रोत आहेत.

 

5/10
BCCI कॉन्ट्रॅक्टमधून ठराविक आणि हमखास कमाई
BCCI कॉन्ट्रॅक्टमधून ठराविक आणि हमखास कमाई

बीसीसीआयनं सिराजला ग्रेड A करार दिला आहे. त्यानुसार त्याला दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतात. त्याशिवाय, प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख, प्रत्येक वनडे साठी 6 लाख आणि टी-२० साठी 3 लाख मिळतात.

6/10
आयपीएल मधून कमाई
आयपीएल मधून कमाई

2025 च्या लिलावात गुजरात टायटन्सने मोहम्मद सिराजला 12.25 कोटींमध्ये विकत घेतलं. आत्तापर्यंत एकट्या IPL मधूनच सिराजने ४० कोटींहून अधिक कमावले आहेत. यामुळे तो भारतातील सर्वात जास्त कमावणाऱ्या गोलंदाजांपैकी एक ठरतो.

7/10
जाहिरातींमधूनही कोटींची कमाई
जाहिरातींमधूनही कोटींची कमाई

सिराज My11Circle, ThumsUp यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. या जाहिरात डील्समधून त्याला दरवर्षी कोटींचं उत्पन्न मिळतं.

8/10
आलिशान बंगला
आलिशान बंगला

हैदराबादमधील ज्युबिली हिल्समध्ये या नावाचा त्याच्याकडे  आलिशान बांगला आहे ज्याची किंमत अंदाजे १३ कोटी रुपये आहे. तसेच इतर मालमत्ता गुंतवणूकही आहे. त्यांच्या जीवनशैलीतून त्यांच्या आर्थिक यशाचे प्रतिबिंब दिसून येते. 

9/10
कार कलेक्शन
कार कलेक्शन

माहितीनुसार  Range Rover Vogue, Mercedes-Benz S-Class, BMW 5-Series, Toyota Corolla, Mahindra Thar अशा गाड्यांचं मोठं कलेक्शन सिराजकडे आहे. 

10/10
ऑनरेरी डीएसपी
ऑनरेरी डीएसपी

सामाजिक योगदान आणि खेळातील योगदान लक्षात घेता, हैदराबाद पोलिसांनी मोहम्मद सिराजला 'ऑनरेरी डीएसपी' (सन्माननीय पोलीस उपअधीक्षक) ही उपाधी प्रदान केली होती.





Read More