Anant Ambani Watch Price: अनंत अंबानी यांनी लग्नात RICHARD MILLE चं घड्याळ घातलं होतं. याचं नाव RM 52-05 TOURBILLON PHARRELL WILLIAMS आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. सर्वसामान्यांपासून ते सोशल मीडिया सगळीकडेच त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका यांचं लग्न जगातील महागड्या विवाहसोहळ्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे लग्नात आलेल्या व्हीआयपी पाहुण्यांना 1.5 ते 2 कोटीचं घड्याळ भेट म्हणून देण्यात आलं.
ही घड्याळं Audemard Piguet ची आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का अनंत अंबानी यांनी लग्नात किती कोटींचं घड्याळ घातलं होतं?
अनंत अंबानी यांनी लग्नात RICHARD MILLE चं घड्याळ घातलं होतं. याचं नाव RM 52-05 TOURBILLON PHARRELL WILLIAMS आहे.
my-watchsite.com वेबसाईटवर या घड्याळाची माहिती देण्यात आली आहे. येथे घड्याळाची किंमत 1 006 500 युरो आहेत. भारतीय चलनात मोजायचं झाल्यास ही किंमत 9,18,00,994 आहे.
RM 52-05 TOURBILLON PHARRELL WILLIAMS संबंधी richardmille च्या अधिकृत वेबसाईटवर हा एक मास्टरपीस असल्याचं लिहिण्यात आलं आहे.
या घड्याळात एक खास डिझाईन आहे, ज्यामध्ये अंतराळवीर स्पेसमधील दुसऱ्या ग्रहावरुन पृथ्वीकडे पाहत असतो. येथे मिल्कीवेमध्ये पृथ्वी दाखवण्यात आली आहे.
RM 52-05 स्मार्टवॉच तयार करण्यासाठी ग्रेड 5 टायटेनियमचा वापर करण्यात आला आहे. याचा एलॉय 90 टक्के टायटेनियम आहे. 6 टक्के अॅल्यूमिनिअम आणि 4 टक्के वेनेडियम आहे.
एअरस्पेस आणि एअरोनॉटिक्स सेक्टरमध्येही या प्रकारच्या मटेरियलचा वापर करण्यात येतो. यावरुन ते किती मजबूत आहे हे दिसतं.
अनंत अंबानी यांनी हातात घातलेलं घड्याळ पाण्यात 30 मीटर खोल गेलं तरी खराब होत नाही.