नुकतेच रिंकू राजगुरुने कृष्णराज महाडिक यांच्यासोबत महालक्ष्मीचे दर्शन घेतले. दोघांचा फोटो सध्या खूप व्हायरल होतोय. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे. चित्रपटामधील तिच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच चित्रपटातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
'सैराट' चित्रपटातून ती घराघरात पोहोचली. सध्या ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या लुकमधील फोटो नेहमी ती चाहत्यांना शेअर करत असते.
सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या फोटोंवर चाहते अनेकदा कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. रिंकू आज मराठी मनोरंजन सृष्टीत आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते.
तिने 'कागर', 'मेकअप', '200 हल्ला हो', 'अनकहीं कहाँनिया', 'झुंड', आणि 'झिम्मा 2' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर ती अद्याप कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.
रिंकू राजगुरुच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं म्हटलं तर ती लवकरच 'खिल्लार' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यासह ती 'पुन्हा एकदा साडे माडे तीन', 'पिंगा', आणि 'आशा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
अभिनेत्री 'जिजाई' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
2017 मध्ये रिंकूने कन्नड चित्रपट 'मनसु मल्लिगे'या चित्रपटात काम केले होते. 2020 मध्ये अभिनेत्रीने हॉटस्टारच्या वेब सिरीज 'हंड्रेड' से डिजिटल स्पेसमध्ये डेब्यू केला होता.