Best Sleeping Position : तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवत असते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
मान आणि पाठदुखीचा त्रास असेल तर डोक्याखाली उशी ठेवू नका. आवश्यक असल्यास, टॉवेल दुमडा आणि लावा. एकंदरीत, उशी अशी असावी की मानेला थोडासा वक्राकार मिळेल आणि डोके शरीराच्या इतर भागापासून खूप उंच नसेल किंवा खाली झुकलेले नसेल.
आपल्या मानेची रचना पूर्णपणे सरळ नसून ती थोडी पुढे झुकलेली असते. झोपताना हे आवर्तन राखणे आवश्यक आहे. खूप जाड किंवा खूप पातळ उशीमुळे मान खराब होऊ शकते. कंबर आणि स्नायूंवर खूप ताण येऊ शकतो.
उठताना पहिलं एका कुशी व्हा आणि मगच उठा. ज्यानंतर आता हलके खाली वाकून नंतर उभे राहा. असे केल्याने तुमच्या शरीराला आराम मिळेल.
पोटावर झोपल्याने पोटावर दबाव तर पडतोच, तसेच मानेवर आणि शरीराच्या मागच्या भागावरही त्याचा खोल दाब पडतो. पण, पोटावर झोपल्यावरच आराम मिळत असेल, तर पोटाच्या खालच्या भागात उशी ठेवून झोपणे. त्यामुळे पोटावर ताण पडणार नाही.
कडेवर झोपताना खांद्याचा पलंगाला स्पर्श झाला पाहिजे. म्हणजेच बाकीचे शरीर एका रेषेत असावे. गुडघ्याच्या मध्यभागी एक उशी ठेवा. कंबर आणि पलंग यांच्यामध्ये मोठे अंतर असल्यास छोट्या उशांचा आधार घ्यावा.
डाव्या बाजूला झोपणे ही सर्वोत्तम चांगली मुद्रा मानली जाते. यामुळे घोरण्याच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. पण, सतत एकाच बाजूला झोपणे योग्य नाही. याचा गुडघे आणि कंबरेवर वाईट परिणाम होतो, कारण या आसनात कंबर वाकते आणि गुडघे एकमेकांवर घासतात. ज्यामळे सांधेदुखीही वाढू शकते. बाजूला झोपताना गुडघ्यांमध्ये उशी ठेवून झोपा, यामुळे एका पायाचा दुसऱ्या पायावर दाब कमी येईल.
तज्ज्ञांच्या मते, नेहमीच आपल्याला पाठीवर झोपण्याचा सल्ला देतात. अशा प्रकारे, शरीराच्या कोणत्याही भागावर जास्त ताण येत नाही. पण, सतत पाठीवर झोपल्याने शरीराच्या पाठीवर दाब पडतो. अशा स्थितीत आपल्या गुडघ्याखाली उशी ठेवून झोपावे. यामुळे आसनासह रक्ताभिसरणही चांगले होते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)