बॉलिवूडची सौंदर्य क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे शिक्षण किती? जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यासोबत तिच्या हटके लुकने सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.
1994 मध्ये ऐश्वर्या रायने 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
कर्नाटकातील मंगलोर येथे ऐश्वर्या रायचा जन्म झाला आहे. काही वर्षांनंतर ती तिच्या कुटुंबासोबत मुंबईत स्थलांतरित झाली.
मुंबईच्या आर्य विद्या मंदिर हायस्कूलमधून तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ऐश्वर्याने जय हिंद कॉलेजमधून इंटरमिजिएट केलं.
ऐश्वर्या रायने डीजी रूपारेल कॉलेजमधून 12 वी केली आहे. 12 तिला 90 टक्के गुण मिळाले होते.
अभिनेत्रीने आर्किटेक्ट होण्यासाठी रचना संसद अकॅडमी ऑफ आर्किटेक्टमध्ये प्रवेश घेतला. पण मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तिने अभ्यास अर्धवट सोडला.
नुकताच अभिनेत्रीने IIFA 2024 'पोन्नियिन सेलवन 2'मध्ये साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे.