आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधीतरी बसने प्रवास केला आहे. पण तुम्हाला बसचा फूलफॉर्म माहिती आहे का? बसमधून प्रवास करुनही अनेकांना त्याचा फूलफॉर्म माहिती नाही.
बसचा फूलफॉर्म किंवा संपूर्ण उच्चार 'omnibus' असा आहे.
बस हा त्याचा शॉर्टफॉर्म आहे. लॅटिनमध्ये याचा अर्थ सर्वांसाठी म्हणजेच For All असा आहे.
सुरुवातीला ही वाहनं सार्वजनिक वाहतुकीसाठी डिझाइन केलेली घोडागाडी होती.
प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्याच्या हेतूने तयार करण्यात आल्याने 19 व्या शतकात या वाहनांना omnibus म्हणत असत.
नंतर omnibus हा शब्द छोटा करत सर्वांना बोलण्यास सोपं जावं म्हणून Bus असा उल्लेख सुरु झाला.
बसेसचा वापर शहरांतर्गत वाहतुकीसाठी केला जातो. विद्यार्थी, वयस्कर, महिला असे अनेकजण बसेसचा वापर करतात.
टॅक्सी, रिक्षा यांच्या तुलनेत बसचा प्रवास खिशाला परवडणारा असतो. यामुळेही अनेकजण बसेसचा वापर करण्याला प्राधान्य देतात.