पाकिस्तानमधील 'पाक' या शब्दाचा अर्थ काय? फाळणीच्या आधीच ठरलं होतं देशाचं नाव!
भारत आणि पाकिस्तानमधील या दोन्ही देशांतील तणाव वाढत आहे. त्यामुळं सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या दोन्ही देशांवर आहे. पाकिस्तान हा शब्ददेखील गुगलवर ट्रेंड होत आहे.
तुम्हाला पाकिस्तान या नावाचा अर्थ माहितीये का? आज आपण पाकिस्तान या शब्दाचा अर्थ आणि हे नाव कोणी दिलं, हे जाणून घेऊयात.
पाकिस्तानची स्थापना 14 ऑगस्ट 1947 साली झाली. पण देशाचे नाव एक दशक आधीच ठरले होते. मुस्लिम राष्ट्रवादी नेते चौधरी रहमत अली यांनी हे नाव सूचवलं होतं.
देश स्वातंत्र्य व्हायच्या आधीच पाकिस्तानची निर्मिती व्हावी अशी मागणी होती. ब्रिटिश राजवटीतच चौधरी रहमत अली यांनी ही मागणी उचलून धरली होती. त्यांनी पाक्स्तान असं नाव सूचवलं होतं.
फाळणी झाल्यानंतर मोहम्मद अली जिन्ना पाक्स्तान नाव बदलून पाकिस्तान असं केलं. पण पाकिस्तानचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ पाकिस्तान असं आहे.
पाकिस्तान या शब्दाचा अर्थ पवित्र भूमी किंवा शुद्ध भूमी असा आहे. पाक आणि स्तान या दोन शब्दांपासून ठेवण्यात आले आहे.
पाक हा शब्द फारसी भाषेत शुद्ध किंवा पवित्र या अर्थाने वापरला जातो. तर, स्तान हा शब्द फारशी भाषेत भूमी किंवा स्थान असा वापरला जातो. हे दोन्ही शब्द एकत्र येऊन पाकिस्तान असा अर्थ होतो.