मध्यमवर्गीयांसाठी टोयोटाने मिनी फॉर्च्यूनर कार लॉन्च केली आहे. 27 किमी मायलेज आणि लक्झरी फीचर्स. जाणून घ्या किंमत
...भारतीय बाजारपेठेत नवनवीन कार लॉन्च होत आहेत. अशातच अनेकांच्या पसंतीस उतरलेली फॉर्च्यूनर कार ही खूपच चर्चेत आहे.
अशातच टोयोटाने भारतात त्यांच्या लोकप्रिय SUV Hyryder ची नवीन 2025 आवृत्ती सुरु केली आहे.
या कारला मिनी फॉर्च्यूनर म्हणून ओळखलं जात आहे. टोयोटाची ही कार फॉर्च्यूनरसारखी दिसत आहे.
कंपनीने या कारमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला असून ही कार आता हायब्रीड, पेट्रोल आणि सीएनजी या तीन पर्यायांमध्ये येते.
SUV Hyryder या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्स असे पर्याय देण्यात आले आहेत.
सीएनजीमध्ये ही कार 27 किमी मायलेज तर हायब्रीडमध्ये ही कार 20 ते 22 किमी मायलेज देते. या कारला एक स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.
या कारमध्ये हवेशीर फ्रंट सीट, मोठी टचस्क्रीन, 6 एअरबॅग, ईबीडी आणि 360 डिग्री कॅमेरासह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
या कारची एक्स-शोरुम किंमत 11.34 लाख रुपये ठेवली आहे. यामध्ये व्हेरिएंट आणि इंधन प्रकारानुसार या कारची किंमत 19 लाखांपर्यंत जाते.