What is the salary of RBI Governor: कॅबिनेटच्या समितीने देशातील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी नियुक्त केलेल्या व्यक्तीने बुधवारी पदभार स्वीकारला. मात्र या व्यक्तीला महिना किती पगार मिळणार आहे माहितीये का?
सर्वसामान्य भारतीयांपैकी अनेकजण जेवढं वर्षाला कमवत नाही तेवढा पगार दर महिन्याला रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला मिळतो. नेमक्या कोणकोणत्या सुविधा गव्हर्नरला मिळतात पाहूयात...
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे.
11 डिसेंबर पासून पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 11 डिसेंबर 2027 पर्यंत संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ असणार आहे.
कॅबिनेटच्या समितीने महसूल सचिव असलेल्या संजय मल्होत्रा यांची निवड रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी केली आहे.
संजय मल्होत्रा हे 1990 च्या राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. हा त्यांचा विद्यार्थी दशेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नोव्हेंबर 2020 मध्ये संजय मल्होत्रा आरईसीचे चेअरमन आणि एमडी या पदावर नियुक्त झाले. त्याआधी ते उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते.
2022 मध्ये डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे सचिव या पदावर संजय मल्होत्रा कार्यरत होते. संजय मल्होत्रा यांना केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या संचालक पदीही नियुक्त केलं होतं.
मात्र रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पुढील तीन वर्षांसाठी संजय मल्होत्रा यांना किती वेतन मिळणार आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला सरकारकडून घर, कार, चालक याशिवाय दर महिन्याला मिळणाऱ्या वेतनाची रक्कम आहे अडीच लाख रुपये!
म्हणजेच तीन वर्षात संजय मल्होत्रा यांना 90 लाख रुपये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असल्याने वेतन म्हणून मिळणार आहेत.
'मनी कंट्रोल'ने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला देण्यात आलेल्या उत्तरामध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला इतर भक्तेही दिले जातात. या साऱ्याचा विचार केल्यास महिन्याला 4 लाखांच्या आसपास खर्च गव्हर्नरवर होतो असं म्हणता येईल.
10 डिसेंबरला कार्यकाळ संपलेले गर्व्हरनर शक्तीकांता दास यांनाही सन 2021-22 दरम्यान महिना अडीच लाख रुपये पगार मिळत होता.