शाहरुख खानसोबत चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्रीकडे आहे आलिशान कारचं कलेक्शन. पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक. तुम्ही ओळखलं का?
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री जाहिरात आणि विविध शोमधून प्रचंड कमाई करत असतात. अशातच आता पाकिस्तानमधील अभिनेत्री चर्चेत आली आहे.
माहिरा खान नुकतीच रेल्वे स्टेशनवर तिच्या चित्रपटाचे शूटिंग करताना दिसली. यामध्ये तिने पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबची नक्कल केली आहे.
तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
माहिरा खान ही पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची 60 कोटींच्या आसपास संपत्ती आहे.
अभिनेत्रीकडे रेंज रोव्हर सारख्या महागड्या कार आहेत. तिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत देखील काम केलं आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री माहिरा खान खूप सक्रिय असते. नेहमी चाहत्यांना वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. माहिरा खानची अभिनयासोबत तिच्या सौंदर्याची देखील चाहत्यांमध्ये चर्चा असते.