Blue Aadhar Card : नवजात बालकांसह जेष्ठांपर्यंत भारतीय नागरिक असणाऱ्या सर्व व्यक्तींना आधार कार्ड बनवणं अतिशय गरजेचं आहे. हे आधारकार्ड भारतीय नागरिकांचं ओळखपत्र म्हणून काम करत. सध्या भारतात आधारकार्ड हे सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे. देशाच्या जवळपास प्रत्येक नागरिकाकडे आधारकार्ड असणं गरजेच आहे. आधारपर्ड हे तुमचं ओळखपत्र म्हणून काम करतं.
सरकारी सुविधा किंवा स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर भारतात तुमच्याकडे आधारकार्ड असणं फार गरजेचं आहे. पण तुम्हाला माहितीये का? सामान्य आधारकार्ड शिवाय ब्लू आधार कार्ड सुद्धा असतं. सामान्य आधारकार्ड सह ब्लू आधार कार्ड सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
भारतात ज्या मुलांचं वय हे 5 वर्षांपेक्षा कमी असतं अशा मुलांसाठी ब्लू आधार कार्ड काढलं जातं. म्हणूनच या ब्लू आधार कार्डला बाल आधारकार्ड असं सुद्धा म्हणतात. ब्लू आधार कार्डला बनवण्यासाठी बायोमेट्रिकची आवश्यकता नसते.
ब्लू आधार कार्ड मुलाच्या जन्मावेळी बर्थ डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि आई वडिलांच्या आधार कार्डनुसार तयार केला जातो.
ब्लू आधार कार्डला भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणद्वारे जारी केलं जातं. हा 12 आकड्यांचा युनिक नंबर असतो, हे आधारकार्ड 5 वर्षांखालील मुलांसाठीच बनवला जातो.
हे आधारकार्ड 5 वर्षांसाठीच व्हॅलिड असतं. त्यानंतर या आधारकार्डला अपडेट करावं लागतं. या ब्लू आधार कार्डचा 5 वर्षांनंतर वापर केला जाऊ शकत नाही. या आधारकार्डवर फक्त मुलांचा फोटो असतो.
ऑनलाइन ब्लू आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी UIDAI वेबसाइटवर जावं लागतं. यात आधारकार्ड रजिस्ट्रेशनमध्ये मुलांची माहिती देण्यासोबतच आई वडिलांचा नंबर सुद्धा लिहिलेला असतो. रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी एनरोलमेंट सेंटर बुक करावं लागतं.
एनरोलमेंट सेंटरवर पालकांचे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि मुलाचा जन्म दाखला यासारखी आवश्यक कागदपत्रे तपासली जातात. त्यानंतर, आधार कार्ड 60 दिवसांच्या आत जारी केले जाते. ते दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवले जाते. ते 5 वर्षांनी अपडेट करावं लागतं.
मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असेल, तेव्हा बायोमेट्रिक माहिती बाल आधारमध्ये अपडेट करावी लागते. सर्व आवश्यक कागदपत्र घेऊन तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागते. मुलाचा बायोमेट्रिक डेटा आधार केंद्रावर घेतला जातो, त्यानंतर हा डेटा मुलाच्या आधार कार्डमध्ये समाविष्ट केला जातो. बायोमेट्रिक डेटा अपडेट केल्यानंतर मुलाच्या आधार क्रमांकामध्ये कोणताही बदल केला जात नाही.