मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. आज गावागावत छत्रपती शिवरायांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहेत. महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. महाराजांप्रती महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आदर आणि प्रेम आहे. आज गावागावात छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आल्याचे आपण पाहतो. फक्त शिवरायच नव्हे तर भारतातील इतर महान योद्ध्यांचे स्मारकही उभारण्यात येतात
छत्रपती शिवराय किंवा एखाद्या महान योद्ध्या स्मारक तुम्ही कधी निरखून पाहिलं आहे का? अश्वारूढ पुतळ्याच्या घोड्याचे कधी एक तर कधी दोन पाय हवेत असतात, असं का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
घोड्याचे दोन्ही पाय हवेत असल्याला ऐतिहासिक अर्थ आहे. महाराजांचा पुतळा हा नेमही अश्वारुढ असतो आणि त्यातही घोड्याने एक पाय दुमडलेला असतो. तर, या उलट राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळाही अश्वारुढ असतो पण या घोड्याचे दोन्ही पाय हवेत उधळलेले असतात. त्याचा नेमका अर्थ काय, हे आज जाणून घेऊया
लढाईत लढताना वीरमरण आलेल्या पराक्रमी योद्ध्याच्या पुतळ्याच्या अश्वाचे दोन्ही पाय हवेत असतात, असा संकेत आहे. राणी लक्ष्मीबाई यांना असंच वीरमरण आलं होतं. त्यामुळं त्यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पाय हवेत उधळलेले आहेत.
जर अश्वारूढ पुतळ्यामध्ये घोड्याचा एकच पाय हवेत असेल तर त्या योद्ध्याचा रणांगणातील जखमांमुळे किंवा दीर्घ धावपळ झाल्यामुळे मृत्यू झालेला असतो. शिवराय, महाराणा प्रताप यांचे अश्वारूढ पुतळ्यांचा एक पाय नेहमी हवेत असतो.
लढवय्या असूनही त्या योद्ध्याचा मृत्यू नैसर्गिक किंवा इतर कारणामुळं झाला असेल तर अश्वाचे चारही पाय जमिनीवर टेकलेले असतात.
पराक्रमी योद्ध्याच्या स्मारकाबाबतचे हे संकेत युरोप व अमेरिकेतून भारतात आले आहेत. मात्र, तरीही भारतात हे नियम जरी बनविले गेले असले तरी विशेष प्रसिद्ध नसल्याने बरेच लोकं पाळताना दिसत नाहीत.