PHOTOS

नव्या वर्षात व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी गुड न्यूज, 4 नव्या अपडेटमुळे बदलेलं चॅटींगचा अनुभव

व्हॉट्सअ‍ॅप चॅनलसंदर्भात 4 फीचर्स आणले गेले आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Advertisement
1/10
नव्या वर्षात तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसतील 4 बदल, युजर्सला होईल फायदा
नव्या वर्षात तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसतील 4 बदल, युजर्सला होईल फायदा

WhatsApp Features: भारतातील लाखो मोबाईलधारक दैनंदिन जिवनात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. आपल्या युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपदेखील अपडेट देत असते.

2/10
खूप फायदा
खूप फायदा

व्हॉट्सअ‍ॅप चॅनलसंदर्भात 4 फीचर्स आणले गेले आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

3/10
चॅनेल फिचर अपग्रेड
चॅनेल फिचर अपग्रेड

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच त्यांचे चॅनेल फिचर अपग्रेड केले आहे. यामुळे ब्रँड, सेलिब्रिटी आणि पब्लीक फिगर्सना त्यांच्या प्रेक्षकांशी जोडणे अधिक चांगले सोपे होणार आहे.

4/10
थेट मेसेज
थेट मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल 2023 वर्षाच्या उत्तरार्धात लाँच करण्यात आले होते. यामुळे यूजर्सच्या त्यांच्या फॉलोअर्सना थेट मेसेज पाठवू शकतात.

5/10
4 नवे फिचर
4 नवे फिचर

आता मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलद्वारे चार नवे फिचर जोडले आहेत. याची माहिती आणि होणारे फायदे जाणून घेऊया. 

6/10
WhatsApp चॅनलची वैशिष्ट्ये
WhatsApp चॅनलची वैशिष्ट्ये

आता चॅनलमधील अ‍ॅडमिनला व्हॉइस मेसेज पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. त्याच्या मदतीने, लोकांना त्यांच्या फॉलोअर्सशी जोडलेले राहणे अधिक चांगले आणि सोपे होईल.

7/10
पोल फीचर
पोल फीचर

याशिवाय मेसेजिंग अ‍ॅप चॅनल्सने पोल फीचर आणण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पोलचा वापर केला असेल तर तुम्हाला ते समजणे सोपे जाईल. पोलच्या मदतीने अ‍ॅडमिन आता फॉलोअर्सना वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे मत विचारू शकतात आणि यासाठी वोटींग घेऊ शकतात.

8/10
एका चॅनेलवर अनेक अ‍ॅडमिन
एका चॅनेलवर अनेक अ‍ॅडमिन

या छोट्या अपडेटनंतर कंपनीने चॅनेलसाठी एक मोठा बदल समोर आणला आहेय ज्यामध्ये आता एका चॅनेलमध्ये एकापेक्षा जास्त किंवा अनेक अ‍ॅडमिन असू शकतात.

9/10
मोठ्या ब्रँडना फायदा
मोठ्या ब्रँडना फायदा

मोठ्या ब्रँडना त्यांचे चॅनेल सक्रिय ठेवण्यासाठी आणि आलेल्या मेसेजेसना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी अधिक लोकांची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना याचा फायदा होईल. 

10/10
लवकरच सर्व युजर्ससाठी
लवकरच सर्व युजर्ससाठी

याशिवाय फॉलोअर्स त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर चॅनेलवरील अपडेट शेअर करू शकतात. याचा अर्थ अधिक लोक हे अपडेट पाहू शकतात. ज्यामुळे चॅनेल अधिक लोकप्रिय होऊ शकतात. या अपडेटची यशस्वी टेस्टिंग झाली असून लवकरच ते सर्व युजर्ससाठी आणले जाणार आहे. 





Read More