WhatsApp New Features: अनेकजण व्हॉट्सअपचा वापर चुकीची माहिती आणि खोटे फोटो पसरवण्यासाठी करतात. काही लोक ॲपवर एआयचा वापर करून बनावट फोटोदेखील शेअर करतात. ही समस्या सोडवण्यासाठी WhatsApp एक नवीन फीचर आणत आहे.
WhatsApp New Features: अनेकजण व्हॉट्सअपचा वापर चुकीची माहिती आणि खोटे फोटो पसरवण्यासाठी करतात. काही लोक ॲपवर एआयचा वापर करून बनावट फोटोदेखील शेअर करतात. ही समस्या सोडवण्यासाठी WhatsApp एक नवीन फीचर आणत आहे.
WhatsApp एक प्रसिद्ध इंस्टंट मेसेजिंग अॅप आहे. मित्रांशी, कुटुंबांशी गप्पा मारण्यासाठी तसंच कामाच्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर केला जातो. सध्याच्या जगात व्हॉट्सअप वापरत नाही अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे.
कंपनी युजर्सला चॅटिंग मजेशीर करण्यासाठी अनेक फिचर्स देते. पण काही लोक या अॅपचा वापर चुकीची माहिती, खोटे फोटो पसरवण्यासाठी करतात. लोक ॲपवर एआयचा वापर करून बनावट फोटोदेखील शेअर करतात.
या समस्येला तोंड देण्यासाठी व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना कोणत्याही फोटोची सत्यता सहज कळू शकणार आहे. म्हणजे व्हॉट्सॲपमधून बाहेर न पडता तुम्ही फोटो खरा आहे की खोटा हे शोधू शकाल.
अलीकडेच व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये ‘सर्च ऑन वेब’ नावाचे एक नवीन फीचर जोडण्यात आलं आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स गुगल लेन्स वापरून कोणत्याही फोटोची रिव्हर्स इमेज शोधू शकतात.
हे करण्यासाठी युजर्सना त्या फोटोवर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल. यामुळे, युजर्सना ब्राऊझर उघडण्याची किंवा Google लेन्स ॲप वापरण्याची आवश्यकता नाही.
सध्या हे नवीन फीचर व्हॉट्सॲपच्या बीटा व्हर्जनमधील काही निवडक युजर्ससाठीच उपलब्ध आहे. त्यामुळे, सर्व युजर्सना उपलब्ध करण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
नुकतंच व्हॉट्सॲपने दोन नवीन फीचर्स लाँच केले आहेत. पहिल्या फीचरमध्ये यूजर्स व्हॉट्सॲपमध्येच कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकतात. त्याच वेळी, दुसरे फीचर इंस्टाग्राम स्टोरीज सारख्या स्टेटसमध्ये लोकांचा उल्लेख करण्याची सुविधा देते.