Whatsapp News : जगभरातील निम्म्याहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातात.
सध्या अनेक यूजर्स व्हॉट्सअॅप स्कॅमला बळी पडत आहेत. हॅकर्स स्मार्टफोन हॅक करण्यासाठी नेहमीच नवीन पर्याय शोधतात. त्यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात केला जातो. लोकांना स्कॅममध्ये अडकवण्यासाठी हॅकर्स विविध पद्धतींचा वापर करतात. व्हॉट्सअॅपची ही सेटींग सुरु राहिल्यास तुमचा फोन हॅक होण्याची शक्यता असते.
व्हॉट्सअॅपवर असे अनेक फिचर्स आहेत जी डीफॉल्टनुसार चालू असतात. WhatsApp Media Auto Download व्हॉट्सअॅपची ही सेटींग डिफॉल्ट सुरु असते. ही सेटिंग तुम्हाला गरज नसल्यास बंद करु शकता.
WhatsApp Media Auto Download हे व्हॉट्सअॅप मध्ये डिफॉल्टमोडमध्ये सुरु असते. या फीचरच्या मदतीने तुमच्या व्हॉट्सअॅपवर येणारा मीडिया म्हणजेच फोटो, व्हिडिओ, ऑडियो आपोआप (Auto) डाउनलोड होतात. हे फिचर बाय डीफॉल्ट चालू असते. यामध्ये तुम्हाला फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्स डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही पर्याय सेट करू शकता.
हॅकर्स या प्रकरणांमध्ये इमेजमध्ये लपवून मालवेअर पाठवतात. त्यानंतर हा फोटो युजरच्या WhatsApp वर पोहचतो. त्यानंतर WhatsApp मध्ये जर फोटो, डॉक्युमेंट, फाईल्स Auto Download सेटिंगमध्ये असतील तर या फाईल्स किंवा फोटो डाऊनलोड होतात. त्यानंतर हॅकर्सद्वारे युजरचा फोन हॅक केला जातो.
WhatsApp Media Auto Download हे फिचर ऑफ करुन शकता. या सेटिंगमधून हॅकर मालवेअर पाठवून फोन हॅक करु शकतो. हे सेटिंग बंद करण्यासाठी तुम्हाला WhatsApp च्या सेटिंग मध्ये जावे लागेल. येथे तुम्ही सर्व सेटिंग्ज मॅन्युअलवर सेट करू शकता. यासाठी तुम्हाला WhatsApp सेटिंगमध्ये जाऊन मीडिया डाउनलोड मध्ये जाऊन लिस्टमधील सर्व पर्याय अनचेक करावे लागतील.
अनचेक केल्यानंतर फक्त तुम्ही डाउनलोड केलेला मीडिया डाउनलोड केला जाईल. अन्य कोणताही मीडिया आपोआप डाउनलोड होणार नाही आणि हॅकर्सना फोन हॅक करण्याची संधी मिळणार नाही.