PHOTOS

भारतात WhatsApp बंद झालं तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय?

 तुमचं व्हॉट्सअ‍ॅप बंद झालं तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? आपण आज अशा पर्यायांबद्दल जाणून घेऊया. 

Advertisement
1/8
भारतात WhatsApp बंद झालं तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय?
भारतात WhatsApp बंद झालं तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय?

WhatsApp Options: भारतातील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी चिंतेची बाब काही दिवसांपासून समोर येतेय. यानुसार भारतात व्हॉट्सअॅप कायमचे बंद होऊ शकते. किंवा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल असे वृत्त आहे. आता काय करायचं? असा प्रश्न व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना पडलाय. तुमचं व्हॉट्सअ‍ॅप बंद झालं तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? आपण आज अशा पर्यायांबद्दल जाणून घेऊया. 

2/8
टेलिग्राम
टेलिग्राम

एक सुरक्षित आमि एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप शोधत असाल तर टेलिग्राम चांगला पर्याय आहे. हे अ‍ॅप भारतात खूप लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणे यात सर्व सुविधा मिळतात. ग्रुप चॅट, वॉइस आणि व्हिडीओ कॉल, फाइल्स पाठवणे आणि खूप काही...टेलिग्राममध्ये चॅनलदेखील आहे. ज्यामुळे तुम्ही एकावेळी खूप साऱ्यांसोबत माहिती शेअर करु शकता. 

3/8
सिग्नल
सिग्नल

हे एक सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप आहे. जे भारतात वेगाने लोकप्रिय होताना दिसतंय.  व्हॉट्सअॅपमध्ये मिळणाऱ्या महत्वाच्या सुविधा येथेदेखील दिसतील. हे ओपन सोर्स आहे. म्हणजेच याच्या सुरक्षेची स्वतंत्र पद्धतीने तपासणी केली जाऊ शकते.

4/8
भारत पे यूपीआय
भारत पे यूपीआय

हे यूपीआय आधारित मेसेजिंग अ‍ॅप आहे. यामध्ये तुम्हाला लोकांना पैसे पाठवण्यासोबत त्यांच्याशी चॅटदेखील करण्याची सुविधा देते. ज्यांना पैशांचा व्यवहारदेखील करायचाय आणि गप्पादेखील मारायच्या आहेत. त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

5/8
कू
कू

कू हे एक भारतीय सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप आहे. जे भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्यांना आपल्या मातृभाषेतून चॅट करायचंय, अशा युजर्ससाठी हे अ‍ॅप उत्तम आहे. 

6/8
एमएक्स टॉक
एमएक्स टॉक

एमएक्स टॉक हे एक भारतीय मेसेजिंग अ‍ॅप असून यात अनेक सुविधा मिळतात. शॉर्ट व्हिडीओ आणि गेम्स खेळता येतात. मजेशीर, मनोरंजक मेसेजिंग अनुभव घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे. 

7/8
एन्क्रिप्टेड असलेले अ‍ॅप
 एन्क्रिप्टेड असलेले अ‍ॅप

कोणतंही अ‍ॅप घेत असाल तर सुरक्षा आणि गोपनीयतेची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. एन्क्रिप्टेड असलेले अ‍ॅप निवडा. तसेच ग्रुप चॅट, वॉइस आणि व्हिडीओ कॉल, फाइल ट्रान्सफर याची गरज आपल्याला नेहमी लागते. त्यामुळे या सुविधा देणारे अ‍ॅप निवडा. 

8/8

स्मार्टफोनला सपोर्ट करणारे अ‍ॅप निवडा. तसेच लोकप्रिय अ‍ॅप निवडा. ज्याचा उपयोग आधी जास्तीत जास्त लोकांनी केलाय अथवा अनेकजण करताय, असे अ‍ॅप निवडणे चांगले ठरु शकते.





Read More