PHOTOS

...तेव्हा गौरीच्या मृत्यूच्या भीतीने शाहरुख खान प्रचंड घाबरला; स्वत: सांगितला घटनाक्रम

Shah Rukh Khan feared About Wife Life: बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी जोडी आणि कपल गोल्स म्हणावं असं जोडपं म्हणजे शाहरुख खान आणि गौरी खान! या दोघांची आतापर्यंतचा प्रवास आणि प्रेमकथा सर्वच चाहत्यांना ठाऊक आहे. मात्र या प्रेमकथेमध्ये एका क्षणी शाहरुखला आपण पत्नी गौरीला कायमच गमावून बसू की काय अशी भीती वाटलेली त्या प्रसंगाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलेलं काय...

 

Advertisement
1/11

गौरीबरोबर नेमकं असं काय घडलं होतं याबद्दल शाहरुखनेच एका मुलाखतीमध्ये दिलेली माहिती. नक्की हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात...

2/11

अभिनेता शाहरुख खानने मागील 3 दशकांपेक्षा अधिक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अगदी 'दिवाना' या पहिल्या चित्रपटापासून ते आताच्या जवानपर्यंत शाहरुखने जी भूमिका साकारली ती गाजली असं समिकरण पाहायला मिळालं आहे. 

 

3/11

प्रोफेश्नल प्रगतीबरोबर खासगी आयुष्यामध्येही शाहरुखने बरंच यश मिळवलं. खास करुन पत्नी गौराचा लग्नासाठी होकार मिळवण्यापासून सुरु झालेली त्याच्या संस्कारीच स्टोरी आजही लोकांना भुरळ घालते.

 

4/11

1991 साली विवाहबंधनात अडकलेल्या शाहरुख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहे. या दोघांकडे अनेकदा आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. त्यांनी मिळवलेलं यश, संपत्तीच नाही तर माणसं जोडण्याची त्यांची कलाही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते.

5/11

1998 साली शाहरुखने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 1997 साली आर्यनच्या जन्माच्या वेळेचा एक किस्सा सांगितला होता. शाहरुखने असा क्षण सांगितला होता जेव्हा त्याला आपण गौरीला गमावून बसू की काय असं वाटलं होतं.

 

6/11

पहिल्यांदाच आई-बाबा होणारे गौरी-शाहरुख आनंदात असणं अपेक्षित असताना शाहरुख मात्र गौरीच्या तब्बेतीबद्दल चिंतेत होता. शाहरुखने स्वत:च गौरीला सी-सेक्शन पद्धतीच्या माध्यमातून प्रसूतीसाठी ऑपरेशन थेअटरमध्ये नेण्यात आलं तेव्हा आपल्याला टेन्शन आलं होतं, असं मुलाखतीत कबुल केलेलं.

7/11

आधीच शाहरुखने त्याचे आई-बाबा दोघांनाही गमावलं होतं. त्यामुळे त्याला रुग्णालयात भीती वाटायची.  याच वातावरणात लेकाच्या जन्माच्यानिमित्ताने यावं लागल्याने आधीच शाहरुख टेन्शनमध्ये होता.

8/11

गौरीला प्रसूतीदरम्यान लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या नळ्या आणि इतर साहित्य पाहून शाहरुख अस्वस्थ झाला होता. त्यावेळी त्याला गौरीची फारच चिंता वाटत होती. तो तिच्याबद्दल विचार करणं थांबवूच शकत नव्हता.

 

9/11

शाहरुख इतका घाबरला होता की गौरीच्या जीवाचं बरं वाईट होईल की काय असंही त्याला वाटून गेलं. बाळाचा जन्म म्हटल्यावर वैद्यकीय शस्रक्रीया आणि इतर गोष्टी ओघाने आल्याच याची कल्पना असतानाही थेट पत्नीच्या मृत्यूच्या विचाराने शाहरुख चांगलाच घाबरला होता. 

 

10/11

त्यातच गौरीला अशा अवस्थेत पाहून त्याची चिंता वाढली होती. होणाऱ्या बाळापेक्षा गौरीची सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याचा शाहरुखचा कल होता. मात्र सारं काही सुरळीत झालं आणि शाहरुखचा जीव भांड्यात पडला.

 

11/11

आर्यन हे नाव ओळख करुन देताना फार छान वाटेल या एकमेव उद्देशाने आपण मुलाचं नाव आर्यन ठेवल्याची मजेदार कबुली शाहरुखने या मुलाखतीत दिली होती. 'आर्यन खान' अशी ओळख करुन देताना छान वाटेल असं वाटल्याने हे नाव ठेवलं, असं शाहरुख म्हणालेला.





Read More