PHOTOS

...अन् रतन टाटांना अमिताभ यांच्याकडे मागावी लागलेली आर्थिक मदत; 10 हजार कोटींच्या मालकाबरोबर असं घडलं काय?

Amitabh Bachchan Ratan Tata On KBC Set: अमिताभ यांनीच यासंदर्भातील सविस्तर किस्सा केबीसीच्या सेटवर सांगितला. अमिताभ यांनी नेमकं काय म्हटलेलं जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम...

Advertisement
1/10

10 हजार कोटींची संपत्ती मागे ठेऊन गेलेल्या रतन टाटांना नेमकी कशासाठी लागलेली अमिताभ यांची आर्थिक मदत? याबद्दल स्वत: अमिताभ यांनी सांगितलेला किस्सा. नक्की घडलेलं काय जाणून घ्या सविस्तरपणे....

2/10
वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंध
वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंध

बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन आणि उद्योग क्षेत्रातील मोठं नाव राहिलेले दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंध होते. दोघांनाही एकमेकांबद्दल फार आदर होता.

 

3/10
रतन टाटांचा अमिताभ यांच्यावर परिणाम
रतन टाटांचा अमिताभ यांच्यावर परिणाम

जरी आज रतन टाटा आपल्यात नसले तरी, त्यांना प्रत्यक्षात ओळखणाऱ्यांनी शेअर केलेल्या आठवणींमधून त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती साधा, सरळ आणि सोपा होता याचा अंदाज येतो. सात पिढ्या बसून खाऊ शकते इतकी प्रचंड संपत्ती असूनही रतन टाटा हे सर्वात आधी ओळखले जायचे ते त्यांच्या विनम्र स्वभावामुळे! या विनम्र स्वभावाचा प्रभाव अमिताभ बच्चन यांच्यावरही पडला!

 

4/10
अमिताभ यांनी शेअर केला अनुभव
अमिताभ यांनी शेअर केला अनुभव

रतन टाटा हयात असताना ज्यांना ज्यांना भेटले त्यांच्यावर त्यांनी आपल्या साधेपणाचा कायमचा प्रभाव पाडला. याचा अनुभव अमिताभ यांनाही घेतला आहे. स्वत: अमिताभ यांनी हा अनुभव जाहीरपणे कथन केलेला.

 

5/10
टाटांना अमिताभ बच्चन यांच्याकडून लागली आर्थिक
टाटांना अमिताभ बच्चन यांच्याकडून लागली आर्थिक

'कौन बनेगा करोडपती'च्या 16 व्या पर्वातील एका भागात चित्रपट निर्माती फराह खान आणि अभिनेता बोमन इराणी विशेष पाहुणे म्हणून आले होते. याच भागात बोलता बोलता अमिताभ बच्चन यांनी रतन टाटांच्या साधेपणाचा त्यांना आलेला अनुभव सांगितला होता. 10 हजार कोटींची संपत्ती मागे ठेऊन गेलेल्या रतन टाटांना नेमकी कशासाठी अमिताभ बच्चन यांच्याकडून आर्थिक मदत लागली होती पाहूयात...

 

6/10
आम्ही दोघे एकदा...
आम्ही दोघे एकदा...

अमिताभ यांनी, "आम्ही दोघे एकदा लंडनला जाणाऱ्या विमानात एकत्र होतो. हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर रतन टाटांना जाणवले की ते त्यांच्या मुख्य सहाय्यकांपासून दुरावले गेलेत. त्यांना आता एक महत्त्वाचा फोन कॉल करायचा होता," असं आठवण सांगताना नमूद केलं.

 

7/10
अमिताभ यांना विश्वासच बसत नव्हता
अमिताभ यांना विश्वासच बसत नव्हता

पुढे बोलताना अमिताभ यांनी, "ते कोणालातरी फोन करण्यासाठी फोन बूथवर गेले. मी तिथेच बाजूला उभा होतो," असं सांगितलं. त्यानंतर रतन टाटा फोन बुथमधून बाहेर आले आणि अमिताभ यांच्याकडे पाहून त्यांना जे काही म्हणाले त्यावर अमिताभ यांना विश्वासच बसत नव्हता असं त्यांनीच आठवण सांगताना नमूद केलं. "अमिताभ, मला थोडे पैसे उधार मिळतील का? माझ्याकडे फोन कॉल करण्यासाठी सुट्टे पैसे नाहीत, असं ते म्हणाले. यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता का?" असा सवाल अमिताभ यांनी आठवण सांगताना विचारला. 

 

8/10
अमिताभ झाले भावूक
अमिताभ झाले भावूक

अमिताभ यांनी रतन टाटा हे 'एवढे साधे' होते असं सांगतानाच भावूक होत, "क्या आदमी थे, मैं बता नहीं सकता!" असंही म्हटलं. लंडन विमानतळावर त्यांनी विचारलेल्या त्या एका साध्या प्रश्नाने त्यांच्याबद्दल शब्दांपेक्षा बरेच काही उलगडून दाखवलं, असंही अमिताभ म्हणाले.

 

9/10
कारचा किस्साही सांगितला
कारचा किस्साही सांगितला

बिग बींनी आणखी एका संवादाची आठवण यावेळी करून दिली. रतन टाटांच्या साधेपणामुळे अनेकदा त्यांच्या मित्रांनाही आश्चर्यचकित व्हायला व्हायचं. रतन टाटा यांच्यासोबत एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका मित्राकडे त्यांनी घरी सोडण्याची विनंती केली तेव्हा त्या मित्राला आश्चर्याचा धक्काच बसल्याचं अमिताभ यांनी सांगितलं. "रतन टाटा माझ्या मित्राला म्हणाले, 'तू मला घरी सोडू शकतोस का? मी तुझ्या घराच्या मागेच राहतो. माझ्याकडे गाडी नाही' असं ते म्हणाले होते याची तुम्ही कल्पना करू शकता का? हे खरोखरच अविश्वसनीय होतं," असं अमिताभ यांनी सांगितलं.

 

10/10
टाटांच्या चित्रपटात अमिताभ यांनी केलेलं काम
टाटांच्या चित्रपटात अमिताभ यांनी केलेलं काम

टाटा समूहाने चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना अमिताभ बच्चन यांनी टाटांसाठी व्यवसायिकदृष्ट्या हात पुढे केला होता. 2004 मध्ये टाटा समूहाची मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील टाटा इन्फोमीडिया लिमिटेड या कंपनीने अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'एतबार' चित्रपटाला आर्थिक पाठबळ दिलं होतं. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चांगली कामगिरी करु शकला नाही. या चित्रपटामुळे सुमार साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले असे म्हटले जाते. (फोटो - फेसबुक, वृत्तसंस्था, युट्यूब आणि ट्वीटरवरुन साभार)





Read More