Heeramandi Actress : OTT प्लॅटफॉर्म Netflix रिलीज झालेला संजय लीला भन्साळी यांचा 'हिरामंडी: द डायमंड बझार' सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या सीरिजमधील एका अभिनेत्रीला सलमान खानने लग्नाची मागणी घातली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शर्मीन सहगल आहे.
हिरामंडी तुम्हाला सोनाक्षी सिंहा, आदिती राव हैदरी, मनिषा कोइरालासह शर्मीन सहगल यांचा अभिनय पाहिला मिळतो.
तुम्हाला माहितीये का? शर्मीन सहगल ही संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. या सिरीजमध्ये तिने तिने मुख्य भूमिका निभावली आहे.
या वेब सिरीजमधील अभिनेत्रींच्या अभिनयाचं कौतुक होतंय. पण शर्मीनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं. तिने ट्रोलिंगला कंटाळून आपलं कमेंट बॉक्स बंद केलंय.
हिरामंडीतील एका अभिनेत्रीला सलमान खाने लग्नासाठी मागणी होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शर्मीन आहे.
शर्मीनने दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितलंय. हा एक मजेदार किस्सा आहे.
झालं असं की, सलमान खान 'हम दिल दे चुके सनम'चे शूटिंग करत असताना शर्मीन आपल्या मामा संजय यांच्या सेटवर जात होती.
त्यावेळी शर्मीन फक्त 4 वर्षांची होती. सलमान खान या छोट्या शर्मीनसोबत खेळायचा आणि मस्ती करायचा. असंच एकदा त्याने शर्मीनला लग्नासाठी मागणी घातली.
त्यावेळी भाईजानच्या या प्रस्तावला छोट्या शर्मीनने नकार दिला. शर्मीन हिरामंडीच्या पूर्वी 2019 मधील मलाल आणि 'अतिथी देव भव' या चित्रपटात झळकली होती.