Actress Refused Rs 600 Crore: सामान्यपणे सेलिब्रिटींची संपत्ती चर्चेचा विषय असते. पण आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तब्बल 600 कोटी रुपयांची वारसा संपत्ती थेट नाकारली. केवळ नाकारली नाही तर अगदी वडिलांचा उल्लेख करत तिने हा संपत्ती नाकारली, नेमकं घडलेलं काय आणि कोण आहे ही अभिनेत्री? कोण देत होतं तिला ही संपत्ती जाणून घेऊयात...
सामान्यपणे वारसा हक्काने मिळणारी संपत्ती फारसे लोक नाकारत नाहीत. मात्र या भारतीय अभिनेत्रीने तब्बल 600 कोटींची संपत्ती नाकारली. कोण आहे ही अभिनेत्री आणि तिला तिच्या घरचे नाही तर कोण देत होतं की वारसा हक्काची 600 कोटींची संपत्ती जाणून घ्या...
सध्या जुने चित्रपट पुन्हा नव्याने थेअटरमध्ये प्रदर्शित होत असल्याने प्रसिद्धीझोतापासून दूर गेलेले अनेक कलाकार पुन्हा चर्चेत आले आहेत. मग ते अभिनेते असो किंवा अभिनेत्री असोत. प्रेक्षकांना हा चित्रपट नव्याने सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड फारच भावल्याचं दिसत आहेत. याच ट्रेण्डमुळे एक अभिनेत्री पुन्हा चर्चेत आलीय.
खरं तर मागील अनेक वर्षांपासून ती मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. ती तशी चित्रपटसृष्टीपासून दूरच आहे. मात्र क्रिकेट आणि मध्यंतरी तिने दिलेल्या काही मुलाखतींमुळे ती अनेकदा बातम्यांमध्ये झळकली आहे. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिने चक्क 600 कोटींची आयती संपत्ती नाकारली होती.
आता ही अशी शेकडो कोटींची संपत्ती नाकारणारी अभिनेत्री कोण आणि तिला ही संपत्ती देत कोण होतं? हे प्रश्न पडणं सहाजिक आहे. मात्र या अभिनेत्रीचे अनेक चित्रपट तुम्ही सुद्धा नक्कीच पाहिले असतील. साधारण दीड दशकांपूर्वी या अभिनेत्रीचा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगलाच दबदबा होता.
चला अखेर नाव सांगूनच टाकूयात... तर भारतामधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आणि आपल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी कलाकार म्हणून आजही जिचं नाव घेतलं जातं आणि तिच्याबद्दल आपण बोलणार आहोत तिचं नाव आहे, प्रिती झिंटा!
एका एका प्रश्नाचं उत्तर तर मिळालं की 600 कोटींची संपत्ती नाकारणारी अभिनेत्री प्रिती झिंटा आहे. पण या सुंदर अभिनेत्रीला अचानक एवढी कोण आणि कशासाठी देत होतं?
दिग्गज चित्रपट निर्माते कमल आमरोही यांचे पुत्र तेच स्वत: प्रसिद्ध चित्रपट निर्माते म्हणून यश मिळवलेले शानदार आमरोही हे प्रिती झिंटाला आपली लेक मानायचे. त्यांचं प्रितीवर फार प्रेम होतं.
काही बातम्यांनुसार, शानदार आमरोही यांना आपली वडिलोपार्जित आणि स्वअर्जित संपत्ती प्रिती झिंटाच्या नावावर करायची होती. शानदार यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये इतकी होती. मात्र शानदार यांनी देऊ केलेली संपत्ती प्रितीने नम्रपणे नाकारली.
मात्र ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि त्याबद्दलची चर्चा झाल्यानंतर प्रितीने प्रसारमाध्यमांसाठी एक पत्रक जारी केलं होतं. यामध्ये तिने माझ्या वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलेलं.
तसेच, "माझी इतकीही वाईट परिस्थिती आलेली नाही की मी इतर कोणाच्या तरी संपत्तीची मला गरज आहे," असंही प्रिती या पत्रकात म्हणाली होती.
सध्या प्रिती ही 'वीर-झारा' चित्रपट सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्याने चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रितीबरोबर शाहरुख खानने प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटाची निर्मिती यश राज फिल्मसने केली होती. दिग्दर्शक यश चोप्रा होते तर लेखक आदित्य चोप्रा होते.
'वीर-झारा' चित्रपट 13 सप्टेंबर रोजी रिलीज झाल्यानंतर त्याने कमाईचा 100 कोटींचा टप्पा ओलांडत 102 कोटींपर्यंत मजल मारली आहे. हा मूळ चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झालेला. या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, दिव्या दत्ता, मनोज बाजपेयी, बोमन इराणी, अनुपम खेर अशी तगडी स्टारकास्ट होती.
प्रिती शेवटची 2018 मध्ये 'भय्याजी सुपरहीट' या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर सनी देओल, अर्शद वारसी, अमिषा पटेल, श्रेयस तळपदे अशी स्टारकास्ट होती.