णि नेहमी हॉट लुकने चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. पण तुम्हाला माहित आहे का की बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असणाऱ्या सई ता...
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
सई ताम्हणकरने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सईला 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' चित्रपटातून खरी ओळख मिळाली.
सई ताम्हणकर ही मूळची सांगलीची आहे. तिने कॉलेजमध्ये असताना अनेक नाटक व एकाकिंकामध्ये भाग घेतला होता.
पण तुम्हाला माहित आहे का की, सई ताम्हणकर सांगलीमधील कोणत्या कॉलेजमध्ये शिकली आहे?
सई ताम्हणकरने सांगलीमधील प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाळामधून शिक्षण घेतलं आहे. तर चिंतामण कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
नुकतीच ती समीर चौघुलेंसोबत 'गुलकंद' या चित्रपटात दिसली. चित्रपटातील दोघांची जोडी खूपच चर्चेत होती.
सईने अनेक हिंदी आणि साउथच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तिने मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.