Coconut Water : शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास हे नारळ पाणी मदत करतं. पण, याच नारळात नेमकं पाणी कुठून येतं हे तुम्हाला माहित आहे का?
नारळाचे वृक्ष अतिशय उंच असून, नारळ हा बाहेरुण टणक आवरणापासून तयार होतो. शिवाय तो सर्व बाजूंनी बंद असतो. पण, मग त्या पाणी कुठून बरं जातं?
नारळात जिथं पाण्याचा भाग असतो, तो असतो त्याचा एंडोस्पर्मचा भाग. आता हे नेमकं काय प्रकरण? तर नारळाचं झाड पाणी साठवून ठेवण्यासाठी फळांचाच वापर करतं. थोड्यात झाडाला मिळणारं पाणी या फळात साचवलं जातं.
वृक्षाच्या खोडामार्फत जमिनीतील पाणी एकत्रित करून या फळांपर्यंत पोहोचवलं जातं. मुळं आणि इतर लहान कोषिकांच्या मार्फत हे पाणी फळांमध्ये साचतं.
नारळ जसजसा मोठा होतो तसतसं त्यातील एंडोस्पर्म पाण्यात मिसळतं आणि पाणी पुढे सुकण्यास सुरुवात होते. हा कोरडा नारळ म्हणजे एंडोस्पर्मचच स्थायू रुप असतं.
नारळाच्या वृक्षातील कोषिकांमुळं ही संपूर्ण प्रक्रिया पार पडते. एंडोस्पर्म एक द्रव असून ते प्रत्यक्षात रंगहिन असतं. पुढं कोषिकांच्याच माध्यमातून ते नारळाच्या कडेला जमण्यास सुरुवात होते. हेच नारळातील खोबरं.
नारळाच्या वृक्षासमवेतच एंडोस्पर्म वाढत असतं आणि पुढं ते न्यूक्लिअसमध्ये रुपांतरित होतं. आहे की नाही निसर्गाची कमाल?
नारळात पाणी नेमकं कुठून येतं हे लक्षात आलं असेल तर, आता त्याचे फायदे पाहता हे नारळ पाणी न विसरता पिण्यास सुरुवात करा.