PHOTOS

औरंगझेब कुठे जन्मला होता? त्याचा मृत्यू कसा झाला?

सर्वात क्रूर मुघल शासक अशी ओळख असणाऱ्या औरंगझेबानं मराठ्यांशी कैक वर्षे लढा दिला. इथं मराठे माघार घ्यायला तयार नसताना औरंगझेबानं त्याना अडचणीत आणण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग अवलंबले. इतिहासातही त्याची अशीच नोंद. अशा या औरंगजेबाचा जन्म कुठे झाला होता? चला, पाहूयात सविस्तर माहिती.

Advertisement
1/6
औरंगझेबाचा जन्म आणि कुटुंबीय
औरंगझेबाचा जन्म आणि कुटुंबीय

औरंगझेबाचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरात राज्यातील दोहाद गावात झाला. तो मुघल सम्राट शाहजहा आणि मुमताज यांचा तिसरा मुलगा होता.

2/6

औरंगझेबाला तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. त्याची क्रुरता एवढी होती की त्याने त्याच्या वडीलांना सुद्धा कैदेत ठेवले होते.

3/6

औरंगझेबाने मुघल साम्राज्याच्या लष्करी व्यवस्थेत विविध पदांवर काम केले. 1658 मध्ये, सम्राटपदासाठी त्याने त्याच्या भावांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.

4/6
दक्षिण भारतातील संघर्ष
दक्षिण भारतातील संघर्ष

औरंगझेबाचे मुख्य लक्ष मराठा साम्राज्य होते. त्याने मराठ्यांवर हल्ले करून दक्षिण भारतात आपले साम्राज्य विस्तारण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठ्यांनी त्याला मोठा विरोध केला आणि याच भूमीत त्याचे साम्राज्य समाप्त झाले.

5/6
मृत्यू आणि अंतिम विश्रांती
मृत्यू आणि अंतिम विश्रांती

औरंगझेबाचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगर येथे झाला, तेव्हा त्याचे वय 88 वर्षे होती. त्याचे गुरू झैनुद्दीन सिराजी यांची कबर खुलताबाद येथे आहे. त्याच्या इच्छेनुसार, औरंगझेबाची कबर ही औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर येथील खुलताबादमध्ये आहे.

 

6/6

अशा प्रकारे, औरंगझेब, ज्याने मुघल साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आणि मराठ्यांना पराभव करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला त्यात यश मिळाले नाही आणि त्याचा पराभव झाला.





Read More