PHOTOS

दीपिका-आलिया नाही; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीनं पहिल्यांदा परिधान केली बिकिनी, संसदेत पोहोचलं होतं प्रकरण

Bollywood Actress Bikini Controversy: चित्रपटसृष्टीत बिकिनी परिधान करणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आजच्या काळात अभिनेत्री या सहज बिकिनी परिधान करतात. त्यात त्या फोटोशूट देखील करतात. अनेकदा त्या सोशल मीडियावर फोटो देखील शेअर करताना दिसतात. आजच्या काळात अनेक अभिनेत्री या त्यांच्या बिकिनी लूकमुळे चर्चेत आल्या आहेत. पण एक काळ होता जेव्हा कोणी बिकिनी परिधान करायचं नाही आणि एका अभिनेत्रीनं बिकिनी परिधान केली आणि त्यावरून मोठा वादा झाला होता. 

Advertisement
1/8

एक काळ होता जेव्हा अभिनेत्री या बिकिनीचं नाव ऐकलं तरी त्यांना लाज वाटायची. मग तुम्हाला माहितीये का की सगळ्यात आधी कोणत्या अभिनेत्रीनं बिकिनी परिधान केली होती. इतकंच नाही तर त्या अभिनेत्रीनं बिकिनी परिधान केल्यानंतर त्यावरून मोठा वाद झाला होता. 

2/8

1966 मध्ये फिल्मफेयर मॅगझीनसाठी सगळ्यात आधी हे बिकिनी फोटोशूट झालं होतं. या फोटोशूटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. चला तर मग जाणून घेऊया कोण होती ती अभिनेत्री जिनं सगळ्यात आधी बिकिनी परिधान केली. 

3/8

खरंतर, 1946 मध्ये डिझायनर लुइस रेअर्डसाठी पहिल्यांदा शोगर्ल मिशेल बर्नाडिनीनं पॅरिसमध्ये बिकिनी परिधान केली होती. तर भारतात सगळ्यात आधी 1966 मध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी पहिल्यांदा फिल्मफेयर मॅगझीनसाठी बिकिनी परिधान केली होती. 

4/8

या बोल्ड फोटोशूटनं प्रत्येकाचं लक्ष वेधलं. अभिनेत्रीनं बिकिनी परिधान केल्यानंतर भारतीय महिलांच्या प्रतिमेवर वाद सुरु झाला होता. कारण लोकांनी या आधी बिकिनी कधी पाहिली नव्हती. त्यामुळे हा वाद फार मोठा झाला होता. इतकंच नाही तर त्याची चर्चा ही संसदेत झाली होती. 

5/8

खरंतर, या काळात अभिनेत्री या फक्त ड्रेस किंवा साडी नेसायच्या. शर्मिला टागोर यांनी बिकिनी परिधान करत हे फोटोशूट केलं आणि वादाची ठिंणगी पेटली. त्यांचा बोल्ड अंदाज हा लोकांना आवडला तर होता पण काही लोकांनी यावर आक्षेप घेतला होता. तरी सुद्धा शर्मिला टागोर या इथे थांबल्या नाही. 

6/8

त्यानंतर शर्मिला टागोर यांनी 1967 मध्ये चित्रपट 'एन इवनिंग इन पेरिस' मध्ये देखील बिकिनी परिधान केली. मोठ्या पडद्यावर शर्मिला यांनी बिकिनी परिधान केल्यानं चांगलाच वाद पेटला. लोकं रस्तावर येऊन त्यांचा विरोध करु लागले. त्यानंतर हे प्रकरण संसदेत पोहोचलं होतं. 

7/8

शर्मिला या जेव्हा चित्रपटात काम करत होत्या तेव्हा क्रिकेटपटू आणि पतौडी कुटुंबातील नवाब मंसूर अली खान यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. ज्यावेळी त्यांचे रस्त्यावर पोस्टर लावण्यात आले होते, त्याच वेळी मंसूर यांच्या आई त्यांना भेटायला मुंबईत येणार होत्या. 

8/8

शर्मिला यांनी जेव्हा हे पोस्टर पाहिले तेव्हा त्या खूप घाबरल्या कारण त्यांना वाटलं की त्यांच्या सासू याविषयी काय विचार करतील. त्यानंतर शर्मिला यांनी निर्मात्यांना फोन केला आणि एका रात्रीत सगळीकडून हे पोस्टर काढण्यात आले. (All Photo : Social Media)





Read More