Top 10 Meat Consuming Countries in the World: जगभरात मांस खाण्याच्या सवयी विविध सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय कारणांवर आधारित असतात. एका अहवालानुसार, पाहूयात कि कोणते देश आघाडीवर आहेत आणि भारताचा कितवा क्रमांक आहे.
लिथुआनियामध्ये 96% लोकसंख्या नियमित मांसाहार करते. येथे डुकराचे मांस, गोमांस आणि चिकन यांचा आहारात मुख्य समावेश असतो.
जपानमध्ये 95% लोक मांस खातात. पारंपरिक सीफूड लोकप्रिय असले तरी अलीकडच्या काळात डुकराचे मांस आणि गोमांस यांची मागणी वाढली आहे.
अर्जेंटिनामध्ये 94% लोक मांसाहार करतात. देशाची स्टेक संस्कृती जगप्रसिद्ध आहे आणि गोमांस हे त्यांच्या आहारातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
ग्रीसमध्येही 94% लोकसंख्या मांस खातात. येथे कोकरूचे मांस, गोमांस आणि डुकराचे मांस आहारात आढळतात.
हंगेरीतील 94% लोक मांसाहारी असून त्यांच्या आहारात प्रामुख्याने डुकराचे मांस आणि गोमांस असते.
नॉर्वेतील 94% नागरिक मांस खातात. येथे कोकरू, डुकराचे मांस आणि सीफूड खूप लोकप्रिय आहे.
रोमानियामध्ये 94% लोकसंख्या मांसाहार करते. चिकन, गोमांस आणि डुकराचे मांस त्यांच्या आहाराचा भाग आहेत.
कोलंबियातील 93% लोक मांस खातात. येथेही डुकराचे मांस, चिकन आणि गोमांस आहारात आढळते.
पोर्तुगालमध्ये 93% नागरिक मांसाहारी आहेत. गोमांस, डुकराचे मांस आणि चिकन येथे मुख्य अन्नपदार्थ आहेत.
चेकोस्लोवाकियातही 93% लोक मांस खाणारे आहेत. येथे चिकन, डुकराचे मांस आणि गोमांस सामान्यतः खाल्ले जाते.
या यादीच्या तुलनेत भारताचा क्रम तळाच्या बाजूला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे शाकाहाराला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मांसाचे सेवन खूपच कमी आहे.
लिथुआनिया, जपान आणि अर्जेंटिना हे देश जगातील सर्वाधिक मांस खाणारे देश ठरले आहेत. तर भारत सर्वात कमी मांस खात असलेल्या देशांमध्ये गणला जातो. मांस खाण्याच्या सवयी केवळ चव किंवा आरोग्यापुरत्या मर्यादित नसून त्या सांस्कृतिक आणि सामाजिक पद्धतींशी जोडलेल्या असतात.