Which Cricketer have most expensive car : भारताच्या अनेक आजी माजी स्टार क्रिकेटर्सना महागड्या आणि आलिशान गाड्यांचा शौक आहे. अनेकजण तर कोट्यवधी किंमत असलेल्या कार चालवतात. यात हार्दिक, कोहली, धोनी अशा दिग्गज क्रिकेटर्सच्या नावांचा समावेश आहे. तेव्हा टीम इंडियाच्या कोणत्या क्रिकेटरकडे सर्वात महागडी कार आहे याबाबत जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माला आलिशान गाड्यांचा शौक आहे. रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माच्या कार कलेक्शनमध्ये सर्वात महागडी कार Lamborghini Urus ही असून त्याची किंमत जवळपास 4.18 ते 4.57 कोटी आहे. ज्यामुळे ही कार फक्त 3.3 सेकंदात 0 ते 100 चा वेग गाठते. या कारचा टॉप स्पीड ताशी 306 किलोमीटर आहे.
ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजाकडे सुद्धा अनेक आलिशान गाड्या असून यातील त्याची सर्वात महागडी कार Rolls Royce Wraith ही आहे. Rolls Royce Wraith ची किंमत जवळपास 5 कोटी असून ही ते फक्त 4.5 सेकंदात 0 ते 100 पर्यंतचा वेग गाठू शकते.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या हा त्याच्या आलिशान लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या कार असून यातील Rolls Royce Phantom ही सर्वात महागडी कार आहे. याची किंमत जवळपास 9.50 कोटी असून भारतीय क्रिकेटर्सपैकी सर्वात महागडी कार ही हार्दिककडे आहे.
विराट कोहली हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक असून त्याच्या कार कलेक्शनमध्ये सर्वात महागडी कार ही 'बेंटले कॉन्टिनेंटल जीटी' असून त्याची किंमत ही 4.4 कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे ऑडी आर8 एलएमएक्स, ऑडी क्यू8 आणि ऑडी आरएस 5 या सुद्धा कार आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या कार कलेक्शनपैकी सर्वात महागडी कार ही 4.2 कोटींची आहे. एस्टन मार्टिन DB11 ही कार फक्त 3.7 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग पकडते.
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे Lamborghini Huracan EVO ही सर्वात महागडी कार आहे. या कारची किंमत 3.73 कोटी रुपये आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे Mercedes Maybach S560 ही कार असून त्याची किंमत ही जवळपास 2.11 कोटी आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एम एस धोनी हा कार आणि बाईकचा शौकीन आहे. धोनीच्या कार कलेक्शनमधील सर्वात महागडी कार ही Ferrari 599 GTO असून याची किंमत ही जवळपास 3.57 कोटी रुपये आहे.