White Hair : आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काहीजण केसांवर वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजेच केस सरळ करणे, केसांना रंग देणे, यामुळे केसांचे पोषण नीट होत नाही आणि केस लवकर पांढरे होताना दिसतात. जर तुम्हाला पण यामधून सुटका हवी असेल तर जाणून घ्या उपाय...
जेव्हा आपण अस्वास्थ्यकर पदार्थ जास्त प्रमाणात खातो तेव्हा केसांना योग्य पोषण मिळत नाही. वयाच्या 25 ते 30 व्या वर्षी केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे आहारात मसालेदार, आंबट आणि कडू पदार्थ कमी करा.
आजकाल प्रदूषणाची समस्या खूप वाढली आहे, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. म्हणूनच प्रदूषित हवा आणि धुळी किंवा धुरापासून केसांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
केस पांढरे होण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त ताण घेणे, रात्री उशिरा झोपणे आणि 7 ते 8 तासांची झोप न घेणे. मन मोकळं ठेवलं तर अशा समस्या उद्भवणार नाहीत.
तुम्हाला जर पांढरे केस पुन्हा काळे करायचे असतील तर त्यावर काही घरगुती उपाय करु शकता. त्यामुळे तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे काळे होतील.
केस काळे करण्यासाठी दह्याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी टोमॅटो बारीक चिरून दह्यात मिक्स करावे. नंतर त्यात थोडे निलगिरी तेल टाका. जर तुम्ही दर ३ दिवसांनी तुमच्या टाळूला मसाज केले तर तुमचे केस काही आठवड्यात काळे होतील.
कांद्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. या कांद्याच्या रसाने तुम्ही टाळूवर मालिश करा. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील तसेच केस गळतीपासूनही तुमची सुटका होईल.
जर तुमचे केस लहान वयातच काळे होऊ लागले असतील तर कढीपत्ता तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यात बायोएक्टिव्ह गुणधर्म आहेत जे केसांच्या मुळांना पोषण देतात. कढीपत्त्याची पाने बारीक करुन केसांच्या तेलात मिसळा. यापासून तयार केलेली पेस्ट आठवड्यातून कोणत्याही एका दिवशी लावा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)