ांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर मेथीसोबत गुळाचे सेवन सुरू करा. या दोघांच्या मिश्रणाचे फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत. म...
White Hair: आधीच्या काळी केस पांढरे झाले की म्हातारा झालास का असे चिडवायचे. पण आता 25 वर्षांच्या तरुणांचे केसही पिकू लागले आहेत.
सध्याची जीवनशैली, प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे केस पांढरे होण्याचे कारण आहे. जर तुम्हीही लहान वयात या समस्येने त्रस्त असाल तर आता काळजी करु नका.
तरुण वयात केस पांढरे होण्यामुळे लाजिरवाण्या प्रसंगाना समोर जावे लागते. यासाठी केमिकलयुक्त हेअर डाईचा वापर केल्यास केस खराब होऊ शकतात, अशावेळी मेथीचा वापर केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसू शकतो.
तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर मेथीसोबत गुळाचे सेवन सुरू करा. या दोघांच्या मिश्रणाचे फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत.
मेथी आणि गुळामुळे केस गळणे, टक्कल पडणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते आणि केसांना चमकही मिळते.
मेथीचा वापर इतर प्रकारेही केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात पाणी ठेवून मेथीचे दाणे मिसळा. यानंतर ते उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या.
या मेथीच्या पाण्याने आपले डोके धुवा आणि सुमारे 15 मिनिटांनी केस धुवा. असे काही दिवस केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होईल.
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी बारीक करून पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. असे काही दिवस केल्यास केस नैसर्गिकरित्या काळे होतील.