PHOTOS

पुराणानुसार 8 चिरंजीव कोण? ज्यांना मिळालंय अमरत्वाचं वरदान

 8 Chiranjeevis According to the Puranas : जीवन आणि मृत्यूचा प्रवास, जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत संपत नाही, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. मायावी मोक्ष चांगल्या कर्माने प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण जन्म आणि मृत्यू या प्रवासात असतो, असं म्हटलं जातं.

Advertisement
1/8
अश्वत्थामा
अश्वत्थामा

एका युद्धात अश्वत्थामा कौरवांकडून लढला होता. त्यावेळी अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडला होता. तो परत घेऊ शकला नाही. त्यामुळे श्रीकृष्णाने त्याला पृथ्वीवर भटकत राहण्याचा शाप दिला होता.

2/8
राजा बळी
राजा बळी

प्रल्हादचा वंशज म्हटल्या जाणाऱ्या राजा बळीने भगवान विष्णूचा अवतार वामनदेव यांना सर्वस्व दान दिलं होतं. त्यावेळी दानधर्मावर प्रसन्न होऊन भगवान विष्णू राजा बळीला वरदान दिलं होतं.

3/8
वेद व्यास
वेद व्यास

महर्षि वेद व्यास यांनी ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद या चार वेदांची रचना केली. तसेच 18 पुराण देखील त्यांनी रचले. वेद व्यास हे ऋषी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र होते.

4/8
हनुमान
हनुमान

श्रीरामाचा सल्ला घेऊन जेव्हा हनुमान श्रीलंकेत गेला होता. त्यावेळी माता सीतेने हनुमानाला अमर राहण्याचं वरदान दिलं होतं, अशी मान्यता आहे.

5/8
विभीषण
विभीषण

धर्म आणि अधर्म यांच्यातील युद्धात विभीषणाने धर्माचे समर्थन केलं अन् रावणाचा वध करण्यासाठी श्रीराम आणि वानर सेनेला साथ दिली होती. त्यामुळे विभीषण हा देखील चिरंजीवी मानला जातो.

6/8
कृपाचार्य
कृपाचार्य

महाभारतात कौरव आणि पांडव यांचे गुरू म्हणून कृपाचार्य यांचा उल्लेख आढळतो. परम तपस्वी ऋषी त्यांना मानलं जातंय. शाश्वत जीवनाचा मार्ग त्यांनी दाखवला होता.

7/8
परशुराम
परशुराम

भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हटल्या जाणाऱ्या परशुराम यांनी भगवान शंकराला प्रसन्न केलं. त्यावेळी शंकराने त्यांना कुऱ्हाड भेट दिली होती. रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये परशुरामाचा उल्लेख आहे.

8/8
ऋषि मार्कण्डेय
ऋषि मार्कण्डेय

महामृत्युंजय मंत्राची रचना ऋषि मार्कण्डेय हे आठवे चिरंजीवी आहेत. तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केलं होतं. त्यावेळी भगवान शंकराच्या आशीर्वादाने ते अमर झाले होते.





Read More