PHOTOS

'तामिळनाडूचे मोदी' महाराष्ट्राचे नवे राज्यपाल... संयुक्त राष्ट्र, RSS कनेक्शन; सी. पी. राधाकृष्णन आहेत तरी कोण?

CP Radhakrishnan Know About Maharashtra New Governor: मध्यरात्रीनंतर 1 वाजता राष्ट्रपती भवनामधून जारी केलेल्या पत्रकामध्ये महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल कोण असतील याची घोषणा झाली. दक्षिणेतील लोकप्रिय चेहरा महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये दिसणार आहे. संयुक्त राष्ट्रांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत अनेक कनेक्शन्स असलेला हा आश्वासक चेहरा कोण आहे जाणून घेऊयात...

Advertisement
1/15

महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले आहेत. सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. मध्यरात्रीनंतर 1 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्याचं पत्रक राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलं.

2/15

विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची मुदत आज म्हणजेच 28 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्याला नवीन राज्यपाल मिळणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र आता पाच वर्षात तिसऱ्यांदा राजभवनात राज्यपाल म्हणून नवीन व्यक्ती दाखल होत असताना हे नवे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आहेत तरी कोण हे जाणून घेऊयात...

 

3/15

सी. पी. राधाकृष्णन हे 67 वर्षांचे आहेत. ते भाजपाचे नेते असून त्यांचा जन्म 4 मे 1957 साली तिरुपूरमध्ये झाला आहे. 

 

4/15

दक्षिणेमधील भारतीय जनता पार्टीच्या सर्वात विश्वासार्ह नेत्यांमध्ये सी. पी. राधाकृष्णन यांचा समावेश होतो. 

 

5/15

वयाच्या 16 व्या वर्षापासूनच सी. पी. राधाकृष्णन राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करु लागले. त्यांनी जनसंघासाठीही काम केलं. 

 

6/15

कोइमतूर मतदारसंघामधून सी. पी. राधाकृष्णन दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी तामिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. 

 

7/15

2004 ते 2007 दरम्यान सी. पी. राधाकृष्णन तामिळनाडूमध्ये पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी राज्यात पक्षाध्यक्ष असताना काढलेली रथयात्रा चांगलीच गाजली होती. ही रथयात्रा तब्बल तीन महिने सुरु होती. 

8/15

सी. पी. राधाकृष्णन संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये भारताचं प्रतिनिधित्वही केलं आहे.

9/15

दक्षिण भारत हा कायमच भाजपासाठी आव्हानात्मक राहिला आहे. याच दक्षिण भारतात भाजपाचे काही आश्वासक चेहरे असून त्यामध्येच सी. पी. राधाकृष्णन यांचा समावेश होतो. 

 

10/15

भाजपाचे केरळचे प्रभारी म्हणून सुद्धा सी. पी. राधाकृष्णन यांनी काम पाहिलं आहे. ते आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात.

 

11/15

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणातील आरोपांना सोडून दिल्यानंतर सी. पी. राधाकृष्णन यांनी मेट्टुपालयममध्ये जोरदार निदर्शने केली होती. यासाठी त्यांना अटकही झाली होती.

12/15

1998 साली कोइमतूनर येथील बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर येथील राजकारण तापलेलं असतानाच सी. पी. राधाकृष्णन यांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. 

 

13/15

जनमानसांमधील लोकप्रियता, कामाचा सपाटा, काम करण्याची आणि आक्रमक राजकारण यासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना 'तामिळनाडूचे मोदी' म्हणूनही ओळखलं जातं.

 

14/15

सी. पी. राधाकृष्णन हे मागील पाच वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले आहेत. 2019 साली भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली. 

 

15/15

5 सप्टेंबर 2017 ते 17 फेब्रुवारी 2023 दरम्यान कोश्यारी राज्यपाल होते. त्यानंतर रमेश बैस यांनी 18 फेब्रुवारी 2023 ते 28 जुलै 2024 दरम्यान महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं. आता राज्याला सी. पी. राधाकृष्णन यांच्या रुपात 24 वे राज्यपाल मिळाले आहेत.





Read More