PHOTOS

अमेरिकेतील सर्वात श्रीमंत भारतीय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती पण आज ₹24,02,73,60,00,000 कंपनीचा मालक

ज्यांनी संघर्ष केला त्यांच्या पायाशी यश लोळण घालेलच. ही बाब हिमाचल प्रदेशमधील या तरुणासाठी ही बाब तंतोतत लागू पडतेय. 

Advertisement
1/7
अमेरिकेतील सर्वात श्रीमंत भारतीय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती पण आज ₹24,02,73,60,00,000 कंपनीचा मालक
अमेरिकेतील सर्वात श्रीमंत भारतीय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती पण आज ₹24,02,73,60,00,000 कंपनीचा मालक

हिमाचल प्रदेश येथील एका तरुणाने लहानपाणापासून संघर्ष पाहिला. स्ट्रीट लाइटच्या खाली बसून त्याने अभ्यास केला. या तरुणाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. मात्र आज अमेरिकेत त्याने यशस्वीरित्या कंपनी उभारली. 

2/7

जय चौधरी यांच्या नावाचा फोर्स्बच्या यादीत समावेश आहे. फोर्ब्सच्या नवीन यादीत, अमेरिकेतील भारतीय वंशाच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव अव्वल स्थानावर आहे.

3/7

फोर्ब्सच्या यादीनुसार, अमेरिकेतील सर्वात श्रीमंत स्थलांतरितांच्या यादीत जय चौधरी अव्वल स्थानावर आहेत. सायबर सुरक्षा कंपनी झेडस्केलरचे ते संस्थापक असून त्यांची संपत्ती 17.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच1,53,414 कोटी रुपये आहे. 

4/7

हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील पानोह गावातील ते मुळचे रहिवासी असून जय यांनी गरिबी जवळून पाहिली आहे, परंतु गरिबीपुढे झुंजण्याऐवजी त्यांनी संघर्ष करुन त्यावर मात केली. त्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज 4 किमी चालावे लागत असे. इतकंच नव्हे तर रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करावा लागला. कारण त्यांनामाहित होते की केवळ शिक्षणच त्यांना गरिबीशी लढण्याची ताकद देऊ शकते.

5/7

जय चौधरी हे अभ्यासात हुशार होते. बनारस हिंदू विद्यापीठातून (IIT BHU) इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी मिळवली. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांनी 1996 मध्ये, पत्नी ज्योतीसोबत SecureIT नावाची कंपनी सुरू केली. नंतर त्यांची कंपनी व्हेरिसाइनने विकत घेतली. त्यानंतर त्यांनी एअरडिफेन्स आणि कोअरहार्बरसारख्या कंपन्या स्थापन केल्या, ज्या मोटोरोला आणि एटी अँड टीने विकत घेतल्या. 1980 मध्ये ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. 2008 मध्ये त्यांनी सायबर सुरक्षा कंपनी झेडस्केलरची स्थापना केली.

6/7

2008 मध्ये झेडस्केलर सुरू केल्यानंतर, त्यांची कंपनी कमी कालावधीतच सायबरसुरक्षा क्षेत्रात आघाडीवर बनली. त्याचा आयपीओ 2018 मध्ये उघडला आणि तो नॅस्डॅकवर सूचीबद्ध झाला. त्यांची कंपनी अमेरिकेतील दोन हजार कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे.

7/7

फोर्ब्सच्या मते, सायबर सुरक्षा कंपनी झेडस्केलरचे सीईओ जय चौधरी हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत भारतीय-अमेरिकन आहेत. त्यांची एकूण संपत्ती 17.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,53,414 कोटी रुपये आहे. त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन $28.5 अब्ज पेक्षा जास्त आहे.





Read More