PHOTOS

Who is Kashish Chaudhary: कोण आहे कशिश चौधरी? बलुचिस्तानमधील हिंदू महिलेची चर्चा का सुरु आहे?

Who is Kashish Chaudhary: बलुचिस्तानच्या नवीन असिस्टंट कमिश्नर पदी कशिश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्या पहिल्या पाकिस्तानी हिंदू महिला आहेत ज्या या पदावर पोहोचल्या आहेत. चला तर त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

Advertisement
1/8

बलुचिस्तानमध्ये कशिश चौधरी या नवीन असिस्टंट कमिश्नरपदी नियुक्त झाल्या आहेत. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या पाकिस्तानी हिंदू महिला आहेत. त्यांनी जे करून दाखवलं त्यानंतर सगळीकडे त्यांचीच चर्चा आहे. 

2/8

सगळेच गूगलवर कशिश यांच्याविषयी सर्च करताना दिसत आहेत. बलुचिस्तान लोक सेवा आयोग (बीपीएससी)ची परिक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. चला तर त्यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. 

3/8

कशिश चौधरी या चगाई जिल्ह्यातील नोशकी शहरातून आहेत. त्यांनी जे करून दाखवलं आहे त्यानंतर पाकिस्तानातील अल्पसंख्यांक लोकांसाठी हे प्रेरणादायी ठरलं आहे. 

 

4/8

दरम्यान, बलुचिस्तान हे पाकिस्तानातील सगळ्यात अशांत ठिकाण आहे. तर कशिश यांनी मिळवलेल्या यशानंतर त्यांची वडील गिरधारी लाल यांना त्यांच्यावर खूप गर्व झाला आहे. त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. 

5/8

लेकीच्या या कामगिरीविषयी बोलताना ते म्हणाले माझ्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की माझ्या लेकीनं इतकी मेहनत घेतली आणि असिस्टंट कमिश्नरची पदवी मिळवली. कशिश यांचे वडील गिरधारी लाल हे मिड-लेव्हल ट्रेडर आहेत. 

6/8

कशिश यांनी त्यांचे वडील गिरधारी लाल यांच्यासोबत केट्टामध्ये बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांची भेट घेतली. या दरम्यान, त्यांनी महिला सशक्तीकरण, अल्पसंख्यांक अधिकारी आणि या परिसरातील विकास अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली. 

7/8

रिपोर्ट्सनुसार, कशिश यांनी तीन वर्षे तयारी केल्यानंतर बीपीएससीची परीक्षा दिली आणि त्या पासही झाल्या. या दरम्यान, दिवस-रात्र त्यांनी खूप मेहनत केली आणि तिनं ही पदवी मिळवली. 

8/8

दरम्यान, कशिश यांच्या या यशाविषयी बोलताना बलुचिस्तानचे मुख्यमंत्री म्हणाले की कशिश राष्ट्र आणि बलुचिस्तानच्या गौरवचं प्रतीक आहेत. पाकिस्तानी हिंदू महिलांना नुकतंच पारंपरिक अर्थात पुरुष प्रधान असलेल्या क्षेत्रांमध्ये पदार्पण केलं असून त्या यशस्वी होत आहेत. त्यांनी इथवर यायला अनेक सांस्कृतीत, धार्मिक आणि सामाजिक गोष्टींना मागे टाकत हे यश मिळवलं आहे. (Photo Social : Social Media)





Read More