देशातील सर्वात महागड्या घरांबाबत बोलायचे झाल्यास सगळ्यात पहिले नाव येते ते मुकेश अंबानी यांच्या अँटिलायाचे. 15000 कोटींची किंमत असलेल्या या घरात अनेक सुविधा आहेत. मात्र अँटिलियाच्या आसपास अनेक भव्यदिव्य बिल्डिंगदेखील उभारल्या आहेत.
अँटिलियाच्या जवळच एक भव्यदिव्य व डोळे दिपवणारी स्कायस्क्रेपर आहे. याचे नाव लोढा अल्टामाउंट आहे. जाणून घेऊयात याचे मालक कोण आहेत. अल्टामाउंट रोड, ताडदेव, गवालिया टँक आणि फोरटेज हिल रोडवर शानदार हाउसिंग बिल्डिंग आहे. या इमारतीत एकूण 43 मजले असून 52 लग्झरी अपार्टमेंट आहेत.
मुकेश अंबानींच्या 27 मजली अँटिलियापेक्षा लोढा अल्टामाउंट खूप उंच आहे. लोढा ग्रुपच्या माध्यमातून हे अल्यामाउंट बनवण्यात आलं आहे. लोढा ग्रुप ही लोकप्रिय रियल इस्टेंट कंपनी आहे.
लोढा ग्रुपचे मालक मंगल प्रभात लोढा असून ते उद्योगपती आणि राजकीय नेतेदेखील आहेत. त्यांनी 1980मध्ये मुंबईत लोढा ग्रुप सुरू केले होते.
मुळचे राजस्थान रहिवाशी असलेले मंगल प्रभात लोढा हे एका सामान्य कुटुंबातील आहे. त्यानंतर त्यांनी लग्झरी अपार्टमेंट आणि प्रकल्पसारखे मुंबईचा ट्रंप टॉवर बनवला. फॉर्ब्सनुसार, त्यांची संपत्ती 12 बिलियन डॉलर इतकी आहे.
या इमारती त्यांच्या काचेच्या भिंती आणि आधुनिक डिझाइनमुळं लोकप्रिय आहे. यात जिम, स्पा, स्विमिंग पूल, मुव्ही लाउंज आणि बोर्डरूमसह विविध सुविधा आहेत. 2015 मध्ये 10,000 वर्ग फुट असलेल्या अपार्टमेंट 16 कोटींमध्ये विक्री झाली होती.
अमेरिकन कॉन्सुल जनरलचे निवासस्थान असलेल्या पूर्वीच्या वॉशिंग्टन हाऊसची जागा या इमारत घेतली. लोढा ग्रुपने 2012 मध्ये ते 341.8 कोटी रुपयांना खरेदी केले होते. अल्टामाउंट रोडला 'बिलियनेअर्स रो' असेही म्हणतात.
मुकेश अंबानी यांच्या व्यतिरिक्त कुमार मंगलम बिर्ला, राधाकिशन दमानी आणि एन चंद्रशेखरन सारखे दिग्गज लोक येथे राहतात. या रस्त्यावरील मालमत्तेच्या किमती देशात सर्वाधिक आहेत.
लोढा अल्टामाउंटमध्ये अनेक मोठे उद्योगपती आणि श्रीमंत लोक राहतात. स्मार्ट कार्ड आयटी सोल्युशन्सचे देवेन मेहता येथे राहतात. ही इमारत तिच्या आलिशान सुविधांमुळे आणि अब्जाधीशांच्या परिसरात असल्याने खूपच खास आहे.