फोटो पाहूनही तुम्हालाही ही महिला बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय असल्याचा भास झाला का? हुबेहुब अभिनेत्री ऐश्वर्यासारखी दिसणारी ही तरुणी आहे तरी कोण?
निळे डोळे आणि चेहऱ्याची ठेवणं पाहून ही तरुणी ऐश्वर्याचीच डुप्लिकेट असल्याचा भास होतो. मात्र, स्वतःची तुलना ऐश्वर्यासोबत होताच ही तरुणी चिडते. मात्र सोशल मीडियावर तिला याच नावाने ओळखले जाते. पाकिस्तानात राहणारी कंवल चीमाचा चेहरा व आवाज ऐश्वर्या रायसोबत जुळतो. कंवल चीमा ही पाकिस्तानची बिझनेसवुमन आहे.
कंवल चीमा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तसंच, तिच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाल्यास तिने 200 अरब डॉलरची कंपनीतील लाखो रुपयांची नोकरी सोडून स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं. तिने डिजिटल स्टार्टअप डिजिटल प्लॅटफॉर्म माय इम्पॅक्ट मीटर (एमआयएम) सुरू केले.
सुरुवातीला तिने पाकिस्तानातच शिक्षण घेतलं. मात्र, नंतर दुसरी ते आठवीपर्यंतचे शिक्षण रियाद येथून पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये गेली. शिक्षणपूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा पाकिस्तानात परतली. नंतर नोकरीसाठी ती पुन्हा रियाद येथे गेली.
माय इम्पॅक्ट मीटरची फाउंटर आणि सीईओ कंवल चीमाने स्वतः एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की, तिने मिलियन डॉलर पगाराची नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरू केला. स्टार्टअपच्या माध्यमातून तिला लोकापर्यंत मदत पोहोचवायची आहे.
कंपनीच्या व्यवस्थापनासोबतच ती पाकिस्तान उद्योजक संघटनेच्या अध्यक्षाही आहेत. तिच्या स्टार्टअपद्वारे ती जगभरातील गरजूंना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांना मदत करते. मदत पुरवणारा आणि गरजू हे दोघं या प्लॅटफॉर्मद्वारे जोडले जातात.
लोकांना जी काही मदत द्यायची आहे ती या प्लॅटफॉर्मच्या मदतीने गरजूंपर्यंत पोहोचवता येते. तिने काम सुरू करण्यापूर्वी, ती CISCO ची माजी ग्लोबल अकाउंट डायरेक्टर आणि Graphient USA च्या मार्केटिंगची माजी उपाध्यक्ष होती.
अनेकदा तिला तु ऐश्वर्यासारखी दिसतेस असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र तिला तिची तुलना ऐश्वर्यासोबत अजिबात आवडत नाही. ती तिच्या यशाचे श्रेय तिच्या पती व सासरच्या व्यक्तींना देते.