IPL 2025 : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने तो खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सची फॅन फॉलोइंग खूप मोठी असते. क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यात सुद्धा त्यांचे फॅन्स उत्सुक असतात. तेव्हा आज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूच्या गर्लफ्रेंड विषयी जाणून घेऊयात.
आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत याच्यावर तब्बल 27 कोटी रुपयांची बोली लागली. लखनऊ सुपर जाएंट्सने ऋषभला आपल्या संघात घेतलं आणि त्याला कर्णधार सुद्धा बनवलं.
12 मार्च रोजी ऋषभ पंतची बहीण साक्षी हिचा विवाह झाला. सध्या तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून या लग्न सोहळ्याला आजी माजी क्रिकेटर्सनी देखील हजेरी लावली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंतची कथित गर्लफ्रेंड ईशा नेगी ही सुद्धा या लग्नात हजर होती. तेव्हा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडबाबत जाणून घेऊयात.
ईशा नेगी ही खूप फॅशनेबल असून सुंदरतेत तर बड्या अभिनेत्रींना सुद्धा मागे सोडते. सोशल मीडियावर ईशा नेगी खूप ऍक्टिव्ह असते, त्यामुळे तिचे इंस्टाग्रामवर अनेक फॉलोअर्स आहेत.
ईशा नेगी हिचा जन्म मुंबईत 20 फेब्रुवारी 1997 रोजी झाला होता. तिचे वडील बिझनेसमॅन असून ईशाने तिचं शिक्षण हे कॉन्वेंट ऑफ जीसस एंड मॅरी देहरादूनमध्ये पूर्ण झालं. नोएडा येथील एका प्राइवेट यूनिवर्सिटीतून तिने इंग्रजीतून बीएचं शिक्षण पूर्ण केलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ईशा नेगी ही इंटेरियर डिझायनर आणि बिझनेस वुमन असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि मॉडेल सुद्धा आहे. ऋषभ पंत आणि ईशा नेगी यांचा फोटो चेन्नईत एका टेस्ट सामन्यादरम्यान व्हायरल झाला होता. त्यानंतर पंतचा अपघात झाल्यावर तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करून पंतला फायटर म्हटले होते.
मसुरी येथे ऋषभ पंतच्या बहिणीचा लग्न सोहळा पार पडला. यावेळी ईशा नेगी सुद्धा त्यात सामील झाली होती. तिने साक्षी पंत आणि तिच्या पतीचा फोटो शेअर करून दोघांना शुभेच्छा दिल्या.