PHOTOS

समित कदम आहे तरी कोण? त्याचा फडणवीसांशी काय संबंध? देशमुखांनी दाखवला दोघांचा फोटो

Who Is Samit Kadam: राज्याच्या राजकारणामध्ये अचानक समित कदम हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. आज तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्यक्तीचे फडणवीसांबरोबरचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले आहेत. पण हा समित कदम आहे तरी कोण? जाणून घेऊयात..

Advertisement
1/13

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा फडणवीस यांचा प्लॅन होता, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

2/13

अनिल देशमुख यांना घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही फोटो दाखवत फडणवीसांवर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत फडणवीसांवर आरोप केले.

3/13

अनिल देशमुखांनी समित कदम यांच्याबरोबरचे फडणवीसांचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच, "तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठवलं होतं," असं अनिल देशमुख म्हणाले.

4/13

"समित कदम माझ्याकडे एफिडेव्हिट घेऊन आले होते. समित कदम आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत," असं अनिल देशमुखांनी म्हटलं आहे. समित यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही याची प्रचिती येते.

5/13

समित कदम यांच्या पत्नीने फडणवीसांबरोबर रक्षाबंधन साजरं केल्याच्या पोस्टचा स्क्रीन शॉटही अनिल देशमुख यांनी पत्रकारांना दाखवला. 

6/13

"नगरसेवक नसलेल्या माणसाला फडणवीस यांनी वाय दर्जाची सुरक्षा दिलीय," असं म्हणत देशमुख यांनी फडणवीसांवर समित कदम यांना सुरक्षा देण्यावरुन निशाणा साधला आहे. 

 

7/13

"राजकीय नेत्यांच्या मुलाला अडकवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न होता. मी समित यांनी आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर तेव्हा सही केली असती तर उद्धव ठाकरे जेलमध्ये असते," असंही देशमुख म्हणाले. 

 

8/13

"फडणवीस यांचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव होता. जर मी त्या एफिडेविटवर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये असते," असं देशमुख म्हणाले.  

9/13

"हा डाव फसला म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील असाच डाव वापरला. तो यशस्वी झाला. अजित पवारांविरोधात देखील असाच डाव वापरला तो सुद्धा यशस्वी झाला," असा धक्कादायक दावा देशमुख यांनी केला होता. 

10/13

"आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणासंदर्भातले आरोप होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी 300 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले असल्याचा देखील आरोप त्या मध्ये होता," असं देशमुख म्हणाले.  

11/13

दरम्यान, दुसरीकडे जनसुराज्य शक्ती युवा प्रदेशाध्यक्ष असलेल्या समित देशमुख यांनी यापूर्वीच देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. 

12/13

"अनिल देशमुख हे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा होती. त्यांनी मी त्यांच्या घरी गेलो होतो याचा खुलासा केला आहे. पण त्यांच्या परवानगीशिवाय मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही, त्यांनी मला बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो,असं स्पष्टीकरण जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केला आहे.

13/13

"तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना माझ्या अडचणीत मदत करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती," असा खुलासा देखील कदम यांनी केला आहे. "त्यामुळे देवेंद्रजी फडवणीस यांचा या गोष्टीशी कोणताही संबंध नाही, असंही समित कदम म्हणाले. 

 





Read More