ब्रिटीश संसदेत कोणी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेत असले तर भारतीयांसाठी तो महत्वाचा क्षण असतो. ब्रिटिश खासदार शिवानी राजा यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. यानंतर त्या भारभरात चर्चेत आल्यायत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Shivani Raja: ब्रिटीश संसदेत कोणी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेत असले तर भारतीयांसाठी तो महत्वाचा क्षण असतो. ब्रिटिश खासदार शिवानी राजा यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. यानंतर त्या भारभरात चर्चेत आल्यायत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ब्रिटिश खासदार शिवानी राजा या 29 वर्षाच्या असून त्या भारतीय वंशाच्या आहेत. गुजराती व्यापारी कुटुंबातून त्या येतात. शिवानी या कंझर्व्हेटिव्ह पार्टीतून लढल्या. आणि त्यांनी लीसेस्टर पूर्व जागेवरुन ऐतिहासिक विजय मिळवला.
शिवानी यांच्या विजयानंतर या मतदारसंघातील मजूर पक्षाचे 37 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले. त्यांनी भारतीय वंशाचे लेबर उमेदवार राजेश अग्रवाल यांच्याविरुद्ध निवडणूक लढली होती.
ब्रिटीश खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच शिवानी यांनी त्यांच्या X हँडलवर माहिती दिली. 'लीसेस्टर पूर्वेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आज संसदेत शपथ घेणे हा माझ्यासाठी सन्मान असल्याचे त्या म्हणाल्या.. मला गीतेवर हात ठेवून महामहिम राजा चार्ल्स यांच्यासोबतच्या निष्ठेची शपथ घेताना खरोखरच अभिमान वाटतो.
शिवानी यांच्या विजयाचा संबंध लीसेस्टर सिटीच्या अलीकडच्या घटनेशी जोडला जात आहे. तेथे 2022 मध्ये भारत-पाकिस्तान T20 आशिया कप सामन्यानंतर भारतीय हिंदू समुदाय आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष झाला होता.लेस्टर पूर्व जागेवर 37 वर्षांनंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाला यश मिळाले आहे.
शिवानी राजा यांना 14 हजार 526 मते मिळाली आणि त्यांनी लंडनचे माजी उपमहापौर राजेश अग्रवाल यांचा पराभव केला, ज्यांना 10,100 मते मिळाली. हा विजय देखील महत्त्वाचा मानला जातोय.
कारण लीसेस्टर पूर्व 1987 पासून मजुर पक्षाचा बालेकिल्ला आहे. शिवानी यांच्या रुपाने 37 वर्षात पहिल्यांदाच या जागेवर कंझर्वेटिव्ह पक्षाचा उमेदवार यशस्वी ठरला आहे.
यावेळी यूके निवडणुकीत शिवानी यांच्याव्यतिरिक्त इतर 27 भारतीय वंशाचे संसद सदस्य हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले आहेत. यावेळी ब्रिटनच्या निवडणुकीत आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पहिल्यांदाच 263 महिलांनी निवडणूक जिंकली आहे. विशेष म्हणजे ही संख्या एकूण खासदार संख्येच्या सुमारे 40 टक्के आहे. त्यापैकी सर्वाधिक 19 कृष्णवर्णीय खासदार आहेत.
यूकेच्या निवडणुकीत, मजूर पक्षाने 650 सदस्यांच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये 412 जागा जिंकल्या, जे 2019 मधील मागील निवडणुकांपेक्षा 211 जास्त आहे. ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ 121 जागा मिळाल्या. त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा 250 जागा कमी आहेत. मजूर पक्षाची मते 33.7 टक्के होती. तर कंझर्व्हेटिव्ह पक्षाची मते 23.7 टक्के होती.