PHOTOS

एका Insta पोस्टचे तब्बल 20 कोटी, ही मुलगी नेमकं करते तरी काय?

काईली जेनर ही अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल आहे. 

Advertisement
1/8

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नसोहळा आज पार पडणार आहे. त्यांच्या मेहंदी आणि संगीत कार्यक्रमात सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. 

 

2/8

आज अनंत आणि राधिकाचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला सोशल मीडिया स्टार काईली जेनर देखील उपस्थित राहणार आहे. 

 

3/8

काईली ही मुळची अमेरिकेची आहे. ती मॉडेल असून सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.  तिला एक फोटो पोस्ट करण्याचे तब्बल 20 कोटी मिळतात. 

4/8

काईली अमेरिकन अभिनेत्री आणि व्यावसायिक  किम कर्दाशियन यांनी सावत्र बहिण आहे. काईलीचे इंस्टाग्रामवर 398 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

 

5/8

काईली ही मॉडेल असण्याबरोबरच अमेरिकेतल्या कॉस्मेटीक कंपनीची मालकीण आहे. त्याचबरोबर ती यशस्वी व्यावसायिक देखील आहे. 

6/8

फॅशन विश्वात काईली यशस्वी मॉडेल आहे. एका मुलाखतीत काईली म्हणाली होती की, तिने प्लॅस्टिक सर्जरी करुन चूक केली. 

7/8

वयाच्या 19व्या वर्षी चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करुन चूक केली असं तिला वाटत होतं. 

 

8/8

आज अनंत आणि राधिकाच्या लग्नाचा शाही सोहळा पार पडणार आहे. या लग्नाचं आमंत्रण अभिनेत्री  किम कर्दाशियनला देखील दिलेलं आहे. 





Read More