Business Woman : एक महिला म्हणून ती कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसते. इतकंच नव्हे तर, पतीच्या बरोबरीनं व्यवसायातही हातभार लावते.
बॉलिवूडची 'लेडी अंबानी', अशी या महिलेची अनोखी ओळख असून तिच्या नावाचा बराच दबदबाही आहे.
ही महिला दुसरीतिसरी कुणी नसून, बॉलिवूडमधील सुपरहिट आणि प्रभावी व्यक्तीमत्त्वं असणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टी याची पत्नी आहे. सुनीलची पत्नी, माना शेट्टी एक यशस्वी उद्योजिका आहे. शिवाय मुंबईतील काही प्रभावी व्यक्तींमध्येही तिचं नाव घेतलं जातं.
(Bollywoods lady ambani) बी टाऊनची ही लेडी अंबानी बऱ्याच स्वयंसेवी संस्थांशीही जोडली गेली आहे. त्यामुळं व्यवसायासोबतच ती सामाजिक भान ठेवतही आपल्या काही जबाबदाऱ्या पार पाडत असते.
पतीच्या सोबतीनं माना (Mana shetty) रिअल इस्टेट फर्म चालवते. S2 रियलिटी ऐंड डेव्हलपर्स असं या कंपनीचं नाव. या कंपनीअंतर्गत मुंबईत तब्बल 21 आलिशान व्हिला साकारण्यात आले आहेत. यातील प्रत्येक व्हिला साधारण 6500 चौरस फुटांच्या भूखंडावर पसलला आहे.
'सेव द चिल्ड्रन' या स्वयंसेवी संस्थेसाठीही मानाचं मोलाचं योगदान आहे. गरीब आणि गरजू मुलांच्या हितासाठी ही संस्था काम करते. माना सातत्यानं या आणि अशा अनेक संस्थांना आर्थिक मदत करताना दिसते. मुंबईमध्ये बऱ्याच प्रदर्शनांचं आयोजन करून त्या माध्यमातूनही ती समाजोपयोगी कामांमध्ये हातभार लावते.
ज्याप्रमाणे सुनील शेट्टी (Suniel Shetty ) चित्रपटांव्यतिरिक्त निर्मिती संस्था, बुटीक, रिअल इस्टेट, हॉटेलिंग अशा व्यवसायांतून जास्तीत जास्त कमाई करतो त्याचप्रमाणे त्याची पत्नीसुद्धा या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. घर आणि उद्योग अशा दोन्ही गोष्टींमध्ये ती सुरेख समतोल राखताना दिसते. याच कौशल्यामुळं तिला लेडी अंबानी असंही म्हटलं जातं.