PHOTOS

'त्या' बिनधास्त सीनमुळे चर्चेत असलेली 'सलोनी भाभी' आहे तरी कोण? नव्या 'नॅशनल क्रश'चं वय फक्त...

Mirzapur 3 Saloni Bhabhi Photos And Facts: नेटफ्लिक्सवरील मिर्झापूर-3 मध्ये सलोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तिने अभिनेता विजय वर्माबरोबर दिलेला एक सीन सध्या चर्चेचा विषय ठरत असून ही अभिनेत्री रातोरात नवी नॅशनल क्रश झाली आहे. ही आहे तरी कोण आणि तिने आधी कोणकोणतं काम केलं आहे पाहूयात..

Advertisement
1/18

सध्या 'नेटफ्लिक्स'वरील 'मिर्झापूर-3' मालिकेमधील सलोनी भाभी ही भूमिका चांगलीच चर्चेत आहे.

 

2/18

अनेक धार्मिक मालिकांमध्येही तिने यापूर्वी भूमिका साकारल्या आहेत. 

3/18

सलोनी भाभीमुळे पुन्हा चर्चेत आलेली ही अभिनेत्री आहे तरी कोण याबद्दल अधिक जाणून घेऊयात...

 

4/18

'मिर्झापूर-3'च्या माध्यमातून भारताला सलोनी भाभीच्या माध्यमातून नवीन नॅशनल क्रश मिळाली आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

 

5/18

मात्र 'मिर्झापूर-3' मध्ये सलोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खरं नाव तुम्हाला ठाऊक आहे का? या अभिनेत्रीचं नाव आहे, नेहा सरगम!

 

6/18

नेहा सरगम असं नाव लावणाऱ्या या अभिनेत्रीचं मूळ नाव नेहा दुबे असं आहे.

 

7/18

नेहाने 'मिर्झापूर-3'मध्ये विजय वर्माच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

8/18

'मिर्झापूर-3'मधील आपल्या भूमिकेने नेहाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडल्याचं सोशल मीडियावर तिच्याबद्दल असलेल्या चर्चेतून स्पष्ट होत आहे.

 

9/18

'मिर्झापूर-3'मधील नेहाचा हटके आणि तितकाच बिनधास्त लूक चाहत्यांना भावला असतानाच ती या क्षेत्रात आधीपासूनच कार्यरत आहे हे आवर्जून नमूद करायला हवं.

 

10/18

2012 साली प्रदर्शित झालेल्या रामायण मालिकेमध्ये नेहाने सीता मातेची भूमिका साकारली होती.

 

11/18

नेहाने केवळ सीता माताच नाही तर 'यशोमती मय्या के नंदलाला' मालिकेमध्ये यशोदा मातेची भूमिका साकारलेली.

 

12/18

त्याचप्रमाणे नेहाने 'परमावतार श्री कृष्ण' मालिकेमध्ये लक्ष्मी मातेची भूमिका साकारलेली.

 

13/18

धार्मिक मालिकांबरोबरच नेहाने 'चांद छुपा बादल में', 'एक बार फिर', 'डोली अरमानों की' या आणि इतर मालिकांमध्ये काम केलं आहे.

 

14/18

फार लोकांना याची कल्पनाही नाही पण नेहाने 'इंडियन आयडल 2' या शोसाठी ऑडिशन दिलं होतं.

 

15/18

'इंडियन आयडल 2'च्या दुसऱ्या फेरीदरम्यान गाणं गाताना शब्द विसरल्याने नेहाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

 

16/18

नेहाने या 'मिर्झापूर-3'मध्ये  विजय वर्माबरोबर दिलेला एक बोल्ड सीन सध्या चांगलाच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

17/18

नेहाचा जन्म 4 मार्च 1988 चा असून ती 36 वर्षांची आहे.

 

18/18

आज हीच नेहा सलोनी भाभीच्या रुपात नवी नॅशनल क्रश म्हणून चर्चेत आहे.

 





Read More