PHOTOS

तब्बल ₹24000 कोटींची संपत्ती, ₹1649 कोटींचं घर; ही 26 वर्षीय तरुणी जगते राजकुमारीसारखं आयुष्य

Vasundhara Oswal: सर्वात महागड्या घराची मालकीण या 26 वर्षीय तरुणीकडे... ती आहे तरी कोण?

Advertisement
1/7
वसुंधरा ओसवाल
वसुंधरा ओसवाल

Who is Vasundhara Oswal: साधारण वर्षभरापूर्वीच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचा आढावा घेतला तर एका बातमीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ही बातमी होती, भारतीय वंशाचे अब्जाधीश व्यावसायिक पंकज ओसवाल (Pankaj Oswal) यांची मुलगी वसुंधरा ओसवालला (Vasundhara Oswal) अटक झाल्याची. 

2/7
संपत्तीची मालकी
संपत्तीची मालकी

अब्जावधींच्या संपत्तीची मालकी असणाऱ्या वसुंधरा ओसवालनं कैक दिवस युगांडाच्या कारागृहात दिवस काढले होते, ज्यानंतर जामिनावर तिची सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तिनं एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आणि पुन्हा एकदा ओसवाल कुटुंबीय चर्चेचा विषय ठरलं. 

3/7
कुटुंब
कुटुंब

हे एक असं कुटुंब आहे, ज्याची श्रीमंती इतकी की या कुटुंबाच्या लेकीसाठी सर्वात महागडं घर खरेदी करण्यात आलं. स्वित्झर्लंड इथं राहणाऱ्या भारतीय अब्जाधीश पंकज ओसवाल आणि राधिका ओसवाल यांनी तब्बल 1649 कोटी रुपयांचं घर खरेदी केलं.  ‘विला वारी’ हे त्यांच्या घराचं नाव. दोन्ही मुलींच्या नावावरून त्यांनी घराला हे नाव दिलं. जवळपास 100 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या घराची बांधणी 1902 मध्ये करण्यात आली होती. 

 

4/7
घर खरेदी
घर खरेदी

वसुंधरा ओसवाल ही पंकज आणि राधिका ओसवाल यांची लेक. आपल्या दोन्ही मुलींसाठी ओसवाल यांनी हे घर खरेदी केलं आणि त्यांना खास भेट दिली. वसुंधरानं तिच्या वडिलांच्या व्यवसायातही कमाल योगदान दिलं. 

5/7
भारतीय संस्कृती
भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा कमाल नमुना या घरात पाहायला मिळतो. तब्बल  40,000  चौरस फुटांचा हा आलिशान बंगला ब्लँक पर्वतालगत असून तिथूनच एक नदीही वाहत जाते. या घरात 12 बेडरूम, 17 बाथरुम, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, हेलिपॅड, सिनेमा हॉल, वाईन सेलारही आहे. 

6/7
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्ये ताजमहालासारख्या घरामुळं हे कुटुंब वादात अडकलं आणि तिथं करबुडवेपणा आणि फसवाफसवीच्या आरोपांमुळं त्यांनी हा देश सोडला. ताजसारखंच घर हे कुटुंब उभारत होतं. पण, वादामुळं या घराचं बांधकाम थांबवण्यात आलं आणि 2016 ला ते पाडण्यात आलं. 

 

7/7
उद्योजक
उद्योजक

वसुंधरा ओसवालचे वडील, पंकज ओसवाल हे भारतीय उद्योजक अभय कुमार ओसवाल यांचे पुत्र. ओसवाल एग्रो मिल्स आणि ओसवाल ग्रीनटेक यांसारख्या कंपन्या त्यांनी सुरु केल्या. पेट्रोकेमिकल्स, रियल एस्टेट, फर्टिलायजर आणि खाणकाम अशा क्षेत्रात त्यांच्या कंपन्या काम करुन गडगंज कमाई करतात. 





Read More