३१ वर्षीय पॉर्न स्टार युरियन बेल्ट्रनच्या मृत्यू नंतर आता आणखीन एका पॉर्न स्टारचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. २३ वर्षीय पॉर्न स्टार ओलिविया लूआचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत पाच पॉर्न स्टार्सचा मृत्यू झाला आहे. (फोटो सौजन्य: ओलिविया लूआ, इंस्टाग्राम)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॉर्न स्टार्सचा मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पॉर्न इंडस्ट्री खूपच त्रस्त आहे आणि असं का हो आहे हे कुणालाच कळत नाहीये. रिपोर्ट्सनुसार, ओलिवियाचा मृत्यू ड्रग्ज आणि दारुच्या सेवनाने झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या तीन महिन्यांत पाच पॉर्न स्टारचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ओलिविया लूआचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: ओलिविया लूआ, इंस्टाग्राम)
ओलिविया लूआच्या आधी डिसेंबर महिन्यात ३१ वर्षीय युरियन बेल्ट्रन आणि २३ वर्षीय अगस्ट एमिज यांचा मृत्यू झाला आहे. युरियन बेल्ट्रनला युरी लव्ह नावाने ओळखलं जातं. युरी लव्हचा मृत्यू एक रहस्य बनलं आहे. युरी लव्हच्या मृत्युमुळे पॉर्न इंडस्ट्रीला एक मोठा झटका बसला आहे. (फोटो सौजन्य: ओलिविया लूआ, इंस्टाग्राम)
लूआने गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात एलए डायरेक्ट मॉडल्स नावाच्या कंपनी जॉईन केली होती. लूआने ऑक्टोबर महिन्यात पॉर्न इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. ती या वर्षी पुन्हा अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणार होती. (फोटो सौजन्य: ओलिविया लूआ, इंस्टाग्राम)
इंग्रजी वेबसाईट 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, ओलिविया लूआ गेल्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. गेल्या काही दिवसांपासून ती औषधांचा ओव्हर डोस घेत होती. ओलिवियाचा मृत्यू १९ जानेवारीला झाला. (फोटो सौजन्य: ओलिविया लूआ, इंस्टाग्राम)