Fastest ball bowled in history of cricket: जगातील सर्वात फास्टर बॉलर्सचा उल्लेख केला की नाव आठवतं ते शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांचं... शोएब अख्तरने इंग्लंडविरुद्ध 161.3 kmph च्या स्पीडने बॉल टाकला होता.
शोएब अख्तर याच्यानंतर म्हणजेच 2003 नंतर एकाही गोलंदाजाला रेकॉर्ड मोडता आला नाहीये. अशातच आता असा कोणता गोलंदाज शोएबचा रेकॉर्ड मोडू शकतो, असा सवाल वसीम अक्रमला विचारण्यात आला.
मला तर वाटत नाही की शोएब अख्तरचा रेकॉर्ड कोणी मोडू शकेल. 161.3 kmph चा हा रेकॉर्ड मोडणं खूप अवघड आहे. कोणता चमत्कार झाला तरच हा रेकॉर्ड मोडला जाईल, असं वसीम अक्रमने म्हटलंय.
कोणत्याही फास्टर बॉलरसाठी 155 आणि 156 च्या स्पीडने टाकणं जमू शकतं पण 161 पर्यंत पोहोचणं अवघड असतंय, असंही मत देखील वसीम अक्रमने नोंदवलं आहे.
क्रिकेट 150 वर्षांपासून खेळलं जातोय. पण इतक्या वर्षांत फक्त एकदाच 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला गेला आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, असंही त्याने यावेळी म्हटलंय.
मी देखील अख्तरने रेकॉर्ड रचलेल्या सामन्यात खेळत होतो. आम्हाला देखील कळालं नाही. आम्हाला साईड स्क्रीनवर रेकॉर्ड झाल्याचं दाखवलं गेलं, असा किस्सा देखील वसीमने सांगितला आहे.