India New Head Coach: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जातंय. मात्र, नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
हेड कोच पदाचा अर्जदार गौतम गंभीर आणि बीसीसीआय यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यावर आली असल्याची माहिती समोर आली आहे.
टीम इंडियाचा हेड कोच म्हणून काम करताना फ्री हँड मिळावा, अशी अट गंभीरने ठेवल्याची माहिती देखील समोर आली आहे.
तर वार्षिक वेतनावर देखील चर्चा सुरू आहेत. गौतम गंभीरने आणि बीसीसीआय यांच्या वार्षिक वेतनावर मतभेद असल्याचं समजतंय.
राहुल द्रविडला हेड कोच पदासाठी वर्षाला 12 कोटी रुपये दिले जात होते. मात्र, गंभीरला किती पैसे मिळणार? असा सवाल विचारला जातोय.
दरम्यान, मुलाखत होऊन 20 दिवस झाले तरी देखील नाव जाहीर होत नाहीये. त्यामुळे गंभीरचं नाव कधी जाहीर होणार? असा प्रश्न विचारला जातोय.