PHOTOS

Davos: वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठका अन् कोट्यवधींचे करार... हे दावोस आहे तरी कुठे?

Whare is Davos? : दावोसला सामान्यांना प्रवेश मिळतो का, कुठे आहे हे अनोखं आणि महत्त्वाचं शहर? जाणून घ्या...

 

Advertisement
1/7
Davos
Davos

Whare is Davos? : दावोसमध्ये मोठे करार, दावोसमध्ये कोट्यवधींची उलाढाल या आणि अशा अनेक बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. 

2/7
वर्ल्ड इकोनॉमिक फोरम
वर्ल्ड इकोनॉमिक फोरम

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अनेक महत्त्वाच्या बैठका होत असताना आणि भारतासह महाराष्ट्रातीलही महत्त्वाच्या नेतेमंडळींची हजेरी असणाऱ्या या शहराला वेगळंच महत्त्वं प्राप्त झालं आहे. याव्यतिरिक्तसुद्धा हे शहर ओळखलं जातं ते म्हणजे तिथं असणाऱ्या निसर्गसौंदर्यासाठी. 

3/7
दावोस लँड
दावोस लँड

दावोस लँड वॉसर नदीच्या काठावर वसलेलं एक सुंदर शहर आहे. जिथं नजर जाईल तिथं बर्फच बर्फ पाहायला मिळतो. या शहरात तापमान बहुतांशी उणेच असतं. इतकंच नव्हे, तर दोन्ही बाजूंनी या शहराला स्विस आल्प्समधील प्लेसूर आणि अल्बूला पर्वतरांगांचा वेढा आहे. 

4/7
युरोप
युरोप

समुद्रसपाटीपासून हे शहर 1560 मीटर इतक्या उंचीवर असून, हे युरोपातील सर्वात उंच शहर असल्याचं म्हटलं जातं. इथं पोहोचणं जणू आपण स्वर्गातील जगतातच आहोत अशी अनुभूती देणारं आहे असं म्हटलं जातं. 

5/7
लोकसंख्या
लोकसंख्या

दावोसची लोकसंख्या अधिक नसून, इथं पर्यटकांसाठी मात्र अधिकाधिक सुविधा असून, त्यांचीच जास्त संख्या पाहायला मिळते. 

6/7
रोमन कॅथलिक
रोमन कॅथलिक

दावोसमध्ये 34.6 टक्के नागरिक रोमन कॅथलिक असून, तिथं यहूदी, मुस्लिम आणि इतर समुदायाचेही नागरिक असल्याचं सांगितलं जातं. 

 

7/7
पर्यटनक्षेत्र
पर्यटनक्षेत्र

एक पर्यटनक्षेत्र असण्यासमवेत दावोस हे ठिकाण आईस हॉकीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. असं हे ठिकाण जगभ्रमंतीचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्याच यादीत अग्रस्थानी पाहायला मिळतं. 

 





Read More