Cities That Changed Their Names : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर एकच चर्चा रंगली या शहराची नावं बदलून सर्वसामान्यांना काय फरक पडणार? असो आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची नावं का बदलली याबद्दल जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने अलाहाबाद हे नाव बदलून आता प्रयागराज केलं. मुघल सम्राट अकबराने या शहराचं नाव इलाहाबाद ठेवलं होतं. त्यांचा नातवाने त्याचं नाव नंतर अलाहाबाद केलं. त्यामुळे आज त्यांचं नाव बदलण्यात आलं.
मनोहर लाल खट्टर सरकारने गुडगावचं नाव बदलून गुरुग्राम असं करण्यात आलं. महाभारतात गुरुग्रामचे वर्णन गुरू द्रोणाचार्यांचं गाव, कौरव आणि पांडवांचं गुरु म्हणून केलं जातं. म्हणूनच आज ते गुरुग्राम म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
आपली मुंबई ही पूर्वी बॉम्बे होती. मुंबादेवीच्या नावावर या शहराचं नाव मुंबई करण्यात आलं. 17 व्या शतकात इंग्रजांनी शहराचा ताबा मिळवल्यानंतर पोर्तुगीजांचं नवा बॉम्बे असं ठेवलं होतं.
राज्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंचा विचार करुन कलकत्ता आज कोलकाता झाला. हे शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. सिटी ऑफ जॉय असं टोपणनावने देखील ओळखलं जातं.
सुमारे सहा शतकं म्हैसूर नावाने ओळखलं जाणारा हा शहर म्हैसुरु म्हणून नावारुपाला आले. कन्नड भाषेत महिषाचे निवासस्थान आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, म्हैसूर हे ठिकाण आहे. जिथे देवी चामुंडेश्वरीने त्याचा वध करण्यापूर्वी राक्षस राजाने राज्य केलं होतं.
मंगलादेवी मंदिराची प्रमुख देवता मंगलादेवी यांच्या नावावरुन या शहराचं नाव देण्यात आले. हे शहर कन्नडमध्ये मंगळुरु म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मंगळुरुच्या विविध समुदायांनी त्यांच्या भाषांमध्ये या शहराला वेगवेगळी नावं दिली होती.
भारताची आयटी राजधानी आजचं बंगळुरु काही वर्षांपूर्वी बंगलोर नावाने ओळखलं जायचं. 2006 मध्ये त्यांचं नाव बंगळुरु झालं. बेंगळुरु कन्नड भाषेतील नाव आहे. नवव्या शतकातील पश्चिम गंगा राजवंशाच्या शिलालेखात बेंगळुरुचा असा उल्लेख आहे.
मद्रास हे नाव 1996 मध्ये चेन्नई असं नाव झालं. हे ब्रिटीशकालीन नाव असल्याने बदलण्यात आलं. ब्रिटीश लष्करी नकाशाकारांचा असा विश्वास होता की मद्रास हा मूळचा मुंडिर राज किंवा मुंडीराज होता. म्हणून त्यांनी हे नावं ठेवले होते.
केंद्राने 2006 मध्ये पाँडेचेरीचं नामातंरण केलं. आता त्याला पुडुचेरी या नावाने ओळखलं जातं. तमिळमध्ये पुडुचेरी याचा अर्थ नवीन शहर असा होतो.
ब्रिटीशकालीन नाव मोदी सरकारने बदलली. ओडिशा हा मूळ आणि प्राचीन नाव आहे. ग्रंथामध्ये पण ओरिसा नाही ओडिशा असा उल्लेख करण्यात आला आहे. पुरीमधील मंदिरांच्या भिंतींवर गजपती राज्याच्या कपिलेंद्र देवाचे शिलालेख या प्रदेशाला ओडिशा असं म्हटलं गेलं आहे.