PHOTOS

Haldi Benefits: लग्नाआधी नवरा- नवरीला हळद का लावतात? ही कारणं तुम्ही कधी ऐकलीच नसतील

Why Do We Apply Turmeric/ Haldi To The Bride And Groom Before Wedding: लगीनघाई असणाऱ्या प्रत्येक घरात उत्साही वातावरणामध्ये एक महत्त्वाचा आणि सर्वांच्याच आवडीचा सोहळा म्हणजे हळदी समारंभाचा. 

Advertisement
1/6
Haldi Ceremony
Haldi Ceremony

लग्नाआधी नवरा- नवरीला छान पेहराव करून त्यांना हळदीनं माखवलं जातं. यामध्ये पाहुण्यांचीही मजाच असते. पण, तुम्ही कधी विचार केलाय का की हळद लग्नाआधी का लावली जाते? 

2/6
Haldi
Haldi

भारतीय आणि त्याहूनही हिंदू संस्कृतीमध्ये हळद शुभ मानली जाते. पिवळा रंग हा समृद्धीचं प्रतीक मानला जातो. ज्यामुळं ही हळद लावली जाते आणि या समारंभाच्या दिवशी अनेकजण पिवळ्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य देतात. 

3/6
Haldi importance
Haldi importance

अशीही धारणा आहे, की हळद लावल्यामुळं वधू- वरांवर असणारी वक्रदृष्टी नाहीशी होते. हळद लागल्यानंतर नवरीमुलगी किंवा नवऱ्यामुलाला मांडवाबाहेर पडू दिलं जात नाही. शिवाय त्यांच्या हाती संरक्षणाच्या हेतूनं लाल धागाही बांधला जातो. 

4/6
Haldi Benefits
Haldi Benefits

प्राचीन काळापासून अशी मान्यता आहे की जी मंडळी अविवाहित आहेत आणि लग्नाच्या वयात आहेत त्यांना हळदी समारंभात हळद लागल्यास लवकरच त्यांचाही विवाहयोग जुळून येतो. 

5/6
Haldi Benefits in marathi
Haldi Benefits in marathi

(Medical importance) औषधी गुणधर्म असण्यासोबत हळद डोकेदुखीही दूर करण्यासाठी मदत करते. त्यामुळं लग्नाच्या गोंधळात आलेला ताण यामुळं कमी होतो. 

 

6/6
Haldi photos
Haldi photos

शरीर शुद्ध करण्यासाठी हळदीची मदत होते. हळद म्हणजे एक्सफोलिएटिंग एजंट असंही सोपं गणित आहे. असं म्हणतात की हळद लागल्यानंतर अंघोळ केल्यानं मृत पेशी निधून जातात आणि शरीर शुद्ध होतं. 

 





Read More